शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 4:14 PM

आता दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण पुढील दसरा, दिवाळी, छठ पूजा सारख्या सणात तिसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांचा सल्ला समजून घ्यायला हवा.

सणासुदीसोबतच देशात कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. दुसरी लाटही अशीच सणासुदीच्या काळातच आली होती. याच वर्षाच्या मार्च महिन्यात होळीनंतर, कोरोना रुग्ण संख्येत अचानक वाढ व्हायला सुरुवात झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर पाहता पाहता एक-दीड महिन्याच्या आतच दुसऱ्या लाटेने एवढा वेग घेतला, की सर्वत्र हाहाकार माजला होता. कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे अत्यावश्यक औषधांचा अभाव, कुठे बेडसाठी मारामारी सुरू होती, तर कुठे रुग्ण रस्त्यावर मरताना दिसत होते. एवढेच नाही, तर दुसऱ्या लाटेची आठवण जरी झाली, तरी शरीराचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. (CoronaVirus Risk of third wave with start of festive season Dr Randeep Guleria warns virus not ended yet)

आता दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण पुढील दसरा, दिवाळी, छठ पूजा सारख्या सणात तिसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांचा सल्ला समजून घ्यायला हवा.

'सणासुदीच्या काळात आनंद घरी घेऊन या, कोरोना संक्रमण नाही' -डॉक्टर गुलेरिया यांनी लोकांना आवाहन केले आहे, की सण साजरे करा, आनंद साजरा करा, मात्र एक गोष्ट लक्षात असून द्या, आनंद घरी घेऊन या कोरोना संक्रमण नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुलेरिया यांचे एक व्हिडिओ स्टेटमेंट शेअर केले आहे, यात त्यांनी जनतेला सणांच्या काळात अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, 'माझा प्रत्येकाला एवढाच सल्ला असेल, की आपण सण साजरा करा, पण हा संसर्ग पसरू नये, अशा प्रकारे साजरा करा. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असू द्या. आपण सण साजरा केला, पण त्यामुळे आपल्याच परिसरात कोरोना रुग्ण वाढले आणि त्यांना रुग्णालयांत दाखल व्हावे लागले, आयसीयूत भरती व्हावे लागले, हेही योग्य ठरणार नाही. हा तर सणांचा नवा निगेटिव्ह इफेक्ट होईल. यामुळे सण साजरा करा, पण त्याच बरोबर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरही असू द्या.'

व्हायरस अद्यापही संपलेला नाही -गुलेरिया म्हणाले, 'हे समजले पाहिजे की व्हायरस अजूनही अस्तित्वात आहे. आपल्या सणांना सुरूवात होत आहे. अनेक सण असे आहेत, जे आपल्याला कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत साजरे करण्याची इच्छा असते. दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, दिवाळी किंवा छठ पूजा, असे अनेक सण आता जवळ येत आहेत. पण हे सण जसजसे जवळ येत आहेत तसतसे आपणही सावध राहण्याची गरज आहे. कारण आपण हे समजून घेतले पाहिजे की हा विषाणू अजूनही अस्तित्वात आहे आणि हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये अधिकाधिक पसरण्याची संधी शोधत आहे.

मास्क, हॅन्ड सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टंसिंगनेच होईल कोरोनापासून बचाव -गुलेरिया म्हणाले, 'कोरोना थांबविण्यासाठी कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित मास्क वापरा. तो चांगल्या प्रकारे लावणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टंसिंग ठेवायला हवे. जेणेकरून विषाणू अधिक पसरणार नाही. याच बरोबर नियमितपणे हात धुवा आणि गर्दी होऊ देऊ नका. तसेच गर्दीच्या ठिकाणी जेणे टाळा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीHealthआरोग्य