धक्कादायक! कोरोनातून बाहेर आलेल्या लोकांना दीर्घकाळ करावा लागणार 'या' समस्यांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:08 PM2020-06-02T12:08:26+5:302020-06-02T12:14:31+5:30

कोरोनातून बाहेर आल्यानंतर शरीरावर होत असलेल्या परिणामांबाबत रिसर्च सुरू आहे.

Coronavirus patients can suffer extreme tiredness and shortness of breath for months myb | धक्कादायक! कोरोनातून बाहेर आलेल्या लोकांना दीर्घकाळ करावा लागणार 'या' समस्यांचा सामना

धक्कादायक! कोरोनातून बाहेर आलेल्या लोकांना दीर्घकाळ करावा लागणार 'या' समस्यांचा सामना

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चाला आहे. एकिकडे कोरोनाच्या माहामारीतून बाहेर येत असलेल्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. अलिकडे ब्रिटेनमधील सरकारी आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्विस(NHS) ने दावा केला आहे की, कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांना दीर्घकाळपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं अशी लक्षणं दिसून येत आहेत. या समस्या अजून कितीवेळपर्यंत राहू शकतात.  याबाबत माहिती मिळालेली नाही. 

ब्रिटेनमधील एजेंसी नॅशनल हेल्थ सर्विस (एनएचएस) ने कोरोना रुग्णांसाठी अलर्ट जारी केला आहे.  तज्ज्ञांच्यामते कोरोना व्हायरसचा परिणाम दीर्घकाळपर्यंत शरीरावर होऊ शकतो. कोरोनातून बाहेर आल्यानंतर माणसाच्या शरीरावर होत असलेल्या परिणामांबाबत रिसर्च सुरू आहे. कोरोनाने ज्या रुग्णांना अधिक गंभीर आजारी केले. त्यांना भविष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर हार्ट एरिथमिया अथवा एंझाइमचा दीर्घकाळ सामना करावा लागू शकतो.

एनएचएसच्या तज्ज्ञांनी गेल्या महिन्यात कोरोनाच्या गंभीर लक्षणांवर चर्चा केली होती. ज्यात कोरोना रुग्णांमध्ये स्ट्रोक, किडनी डिसीज, शरीरातील अवयवांच्या क्षमतेवरील परिणाम दिसून आला. याशिवाय कोविड १९ ने बरे होत असलेले रुग्ण जास्त प्रमाणात आहेत. त्याच्यासाठी सामान्य जीवन जगणं खूप कठीण होऊन बसेल. तसंच कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांसाठी ब्रिटेनमध्ये एक मॉडेल तयार केलं जाणार आहे. रुग्णांच्या ज्यामुळे मानसिक असंतुलन, श्वास घेण्यासाठी त्रास होणं, हृदयरोगांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. 

मागील काही दिवसात चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये डिप्रेशन, इंसोमेनिया, ईटिंग डिसॉर्डर आणि विविध प्रकारचे मानसिक आणि न्यूरोलॉजिकल समस्या असतात. याशिवाय, त्यांचे स्नायू आणि बॉडी फंक्शनमध्येही विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कोरोनापासून बचावासाठी भारतीयांचा 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी; ब्रिटेनमधील तज्ज्ञांचा दावा

Coronavirus: कोरोनावर ‘हे’ औषध अत्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध; अनेक रुग्ण बरे झाल्याचं चित्र!

Web Title: Coronavirus patients can suffer extreme tiredness and shortness of breath for months myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.