कोरोनापासून बचावासाठी भारतीयांचा 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी; ब्रिटेनमधील तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:03 AM2020-06-02T10:03:44+5:302020-06-02T10:06:03+5:30

ब्रिटेनच्या तज्ज्ञांनी एक दिलासादायक दावा केला आहे.

CoronaVirus : Hot water and salt gargle may help to fight corona says scientist myb | कोरोनापासून बचावासाठी भारतीयांचा 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी; ब्रिटेनमधील तज्ज्ञांचा दावा

कोरोनापासून बचावासाठी भारतीयांचा 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी; ब्रिटेनमधील तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत असलेली भीती वाढत आहे. कोरोना व्हायरसवर लस किंवा औषध शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी लसींबाबत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

आयुष मंत्रालयानेसुद्धा कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय वापरण्याचा सल्ला दिला आहे. अशा स्थितीत ब्रिटेनच्या तज्ज्ञांनी एक दिलासादायक दावा केला आहे. अनेकजण कोरोनापासून बचावासाठी वेगवेगळे उपाय वापरत असताना  मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे कोरोनापासून लांब राहता येऊ शकतं. असा दावा ब्रिटेनमधील संशोधकांनी केला आहे. 

ब्रिटेनच्या एडिनबर्ग युनिव्हरसिटीमध्ये हे संशोधन सुरू होते. पाण्याच्या गुळण्यांवरून शास्त्रज्ञांनी संशोधन केले होते. संशोधकांच्यामते मीठ आणि गरम पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे संक्रमणाची लक्षणं कमी होण्यास मदत होते. तसंच या उपायामुळे संक्रमणाची तीव्रता कमी होऊ शकते.  

गरारे

६६ रुग्णांवर १२ दिवसांपर्यंत संशोधन सुरू होतं.

ब्रिटेनच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या ६६ रुग्णांवर हे संशोधन केलं होतं. या रुग्णांना इतर उपचारांसोबत मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी सांगण्यात आलं. १२ दिवसांनंतर या रुग्णांच्या सॅम्पलची चाचणी करण्यात आली तेव्हा त्या रुग्णांमधील संक्रमण कमी झालेले दिसून आले. 

जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार मीठाच्या पाण्याने गुळण्या केलेल्या रुग्णांमध्ये दीड दिवसात संक्रमणाचा वेग कमी दिसून आला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या उपायाचा वापर केल्यास संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो.  या आधी आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करून संक्रमणाची तीव्रता कमी केली जाऊ शकते. 

आयुष मंत्रालयानेसुद्धा लोकांना गरम पाणी  पिण्याचा सल्ला दिला होता.  तसंच यांनी दिलेल्या गाईडलाईन्स नुसार सकाळी आणि संध्याकाळी गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास घसा चांगला राहतो. घसा बसणं, खवखवणं, आवाज खराब होणं अशा समस्यांना लांब ठेवायचं असेल तर भारतीय घरगुती उपायांचा वापर करायला हवा. 
मोठा दिलासा! निष्क्रिय होत आहे कोरोनाचा विषाणू; 'या' देशातील टॉप तज्ज्ञांचा दावा

शरीरातील आयोडिनची कमतरताही ठरू शकते इन्फेक्शनचं कारण; जाणून घ्या उपाय

Web Title: CoronaVirus : Hot water and salt gargle may help to fight corona says scientist myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.