CoronaVirus News : New coronavirus losing potency top italian doctor says myb | मोठा दिलासा! निष्क्रिय होत आहे कोरोनाचा विषाणू; 'या' देशातील टॉप तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! निष्क्रिय होत आहे कोरोनाचा विषाणू; 'या' देशातील टॉप तज्ज्ञांचा दावा

(प्रातिनिधीक फोटो) 

कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अशा स्थितीत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. इटलीतील टॉप डॉक्टरांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची क्षमता आता हळू हळू कमी होत आहे. याशिवाय कोरोना व्हायरस जास्त काळ जीवघेणा ठरू शकत नाही. जेनोआच्या सॅन मार्टिनो रुग्णालयातील संक्रमण रोग प्रमुख डॉक्टर मॅट्टेओ बासेट्टी  यांनी  ANSA या न्यूज एजेंसीशी बोलताना ही माहिती  दिली आहे.
 

डॉक्टर मॅट्टेओ यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आता कमकुवत होत आहे. त्या व्हायरसमध्ये दोन महिन्याआधी अस्तिवत्वात होती अशी क्षमता उरलेली नाही. सध्याच्या कोविड19 ची तीव्रता वेगळी आहे. लोम्बार्डी येथिल सेन राफेल रुग्णालयाचे प्रमुखे अल्बर्टो जांग्रिलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस आता इटलीमध्ये तीव्रतेने जाणवत नाही. मागील १० दिवसातून स्वॅब सॅपलद्वारे दिसून आले की, दोन महिने आधीच्या तुलनेत आता व्हायरसच्या संक्रमणाचं प्रमाण कमी झालं आहे.

कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका बसलेल्या देशांपैकीच इटली हा देश आहे. तसंच कोरोनाने  होत असलेल्या मृत्यूंमध्ये इटलीचा तिसरा क्रमांक आहे. इटलीत मे महिन्यात रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या कमी झालेली दिसून आली होती. त्यामुळे इटलीतील अनेक ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येत आहे. इटलीतील तज्ज्ञांनी लोकांना सावधगिरी बाळगायला सांगितले आहे. 

तसंच कोरोना व्हायरसपासून जिंकल्याचा दावा केल्यास घाई केल्यासारखे होण्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सँड्रा जम्पा यांनी सांगितले की, लोकांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. तसंच  सोशल डिस्टेंसिंग पाळणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं. सतत हात धुणं, मास्क वापरणं सध्याच्या स्थितीत फायद्याचं ठरेल. 

शरीरातील आयोडिनची कमतरताही ठरू शकते इन्फेक्शनचं कारण; जाणून घ्या उपाय

मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : New coronavirus losing potency top italian doctor says myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.