मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 03:09 PM2020-06-01T15:09:40+5:302020-06-01T15:12:46+5:30

या अभ्यासातून कोरोना विषाणू मृतांच्या शरीरात कितीवेळपर्यंत जीवंत राहू शकतो हे समजण्यास मदत होईल.

Aiims doctors will update on how much time coronavirus activeted on dead body myb | मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन

मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन

Next

 कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना दिल्लीतील एम्समधील डॉक्टर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पोस्टमार्टमवर विचार करत आहेत. कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना कितीवेळ राहतो आणि त्यामुळे संक्रमणाचा प्रसार होऊ शकतो का यावर तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. दिल्लीतील रुग्णालयातील फॉरेंसिक प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासात विषाणूंचा माणसाच्या शरीरावर कसा परिणाम  करतो याबाबत विचार केला जाणार आहे. 

त्यांनी सांगितले की,  या अभ्यासाठी मृत शरीरासाठी  कायदेशीर परवागनी घेतली जाणार आहे. हे पहिले अध्ययन असल्यामुळे सावधगिरी बाळगण्यात येणार आहे. या अभ्यासातून कोरोना विषाणू मृतांच्या शरीरात कितीवेळपर्यंत जीवंत राहू शकतो हे समजण्यास मदत होईल. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की, मृत शरीरातील विषाणू हळूहळू नष्ट होतो. पण मृत शरीराताला संक्रमणमुक्त घोषित करण्याचा कोणताही वेळ निश्चित नाही.

आईसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णाचे फॉरेंसिक पोस्टमार्टमसाठी चीर- फाडीच्या तंत्राचा वापर केला जाऊ नये. कारण त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचारीवर्गाच्या आरोग्याला जीवघेण्या आजारांचा धोका असू शकतो. 

'या' नवीन लसीने कोरोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा?; ३ देशात क्लिनिकल ट्रायल सुरु

CoronaVirus : उन्हाळा असो किंवा पावसाळा; 'ही' सवय असलेल्या लोकांना कोरोनाचा दुप्पट धोका!

Web Title: Aiims doctors will update on how much time coronavirus activeted on dead body myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.