CoronaVirus : धोका वाढला! 'या' वस्तूंवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 03:55 PM2020-10-12T15:55:43+5:302020-10-12T16:08:35+5:30

CoronaVirus News & Latest Updates : सीएसआयआरओने दिलेल्या माहितीनुसार एका नियंत्रित वातावरणात कोरोना व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहू शकतो. हा अभ्यास वायरोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. 

CoronaVirus : Novel coronavirus can last 28 days on glass currency australian study | CoronaVirus : धोका वाढला! 'या' वस्तूंवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू, तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus : धोका वाढला! 'या' वस्तूंवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसवर संपूर्ण जगभरातील शास्त्रचे संशोधन सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील नॅशनल सायंस एजेंसी सीएसआईआरओ (CSIRO) ने कोरोना व्हायरसबाबत नवीन चिंताजनक दावा केला आहे. सीएसआयआरओने दिलेल्या माहितीनुसार एका नियंत्रित वातावरणात कोरोना व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहू शकतो. हा अभ्यास वायरोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. सीएसआयआरओच्या संशोधकांना दिसून आले की कोरोना व्हायरस २० डिग्री सेल्सियस (68 डिग्री फ़ारेनहाइट) या तापमानात  फोनची स्क्रिन, काच यांसारख्या भागात २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो.  

कोरोनाच्या तुलनेत एफ्लुएंजा व्हायरस १७ दिवसांपर्यंत एखाद्या ठिकाणी जीवंत राहू शकतो. या अभ्यासाचे प्रमुख संशोधक शेन रिडेल यांनी सांगितले की, ''या संशोधनामुळे सतत हात धुणं, सॅनिटायजरचा वापर करणं आणि स्वच्छता ठेवण्याचं महत्व वाढलं आहे. कोरोना व्हायरसच्या सुकलेल्या ड्रॉपलेट्सवर हा अभ्यास करण्यात आला होता. २०, ३० आणि ४० डिग्री सेल्सिअस तापमानावर करण्यात आलेल्या या संशोधनातून  दिसून आलं की, कोरोना व्हायरस थंड ठिकाणी जास्तवेळपर्यंत जीवंत राहू शकतो. ''

कोरोना वायरस पर खोज जारी

हवा आणि मोकळ्या परिसराच्या तुलनेत प्लेन सरफेस, प्लास्टिक बँक नोट्सच्या तुलनेत पेपर नोट्सवर कोरोना व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहू शकतो. पराबॅगमी प्रकाशाच्या प्रभावाला दूर ठेवण्यासाठी हे सर्व प्रयोग अंधारात करण्यात आले होते. कारण एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार सुर्यप्रकाशात व्हायरस जास्तवेळ जीवंत राहू शकत नाही.  संशोधकांनी सांगितले की, शरीरातील तरल पदार्थांमध्ये असणारे प्रोटिन्स शरीरातील व्हायरसचा प्रभाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

या अभ्यासामुळे मीट पॅकिंग सुविधा यांसारखे ठंड वातावरणात असलेले घटक आणि व्हायरसला अनुकूल असलेलं वातावरण यांच्यातील संबंध समजण्यास मदत होऊ शकते. अन्य देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलं आहे. तापमान आणि कोरोना व्हायरसच्या संबंधांवर याआधीही अभ्यास करण्यात आला होता. अनेक देशातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीच्या वातावरणात कोरोना व्हायरसच्या जास्त केसेस समोर येण्याची शक्यता आहे. 

थंडी अन् प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार

दरम्यान एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रसाराबाबत धोक्याची सुचना दिली आहे. डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले की, प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना संक्रमित रुग्णांमध्येही वाढ होऊ शकते. डॉक्टर गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदुषणाच्या पीएम २.५ स्तरात वाढ झाल्यास कोरोनाच्या संक्रमणात ८ ते ९ टक्क्यांनी वाढू शकते. कोरोनासोबतच प्रदूषण वाढण्यामुळे श्वसन आणि फुफ्फुसांसंबंधी आजार वाढू शकतात. सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले होते की, हिवाळ्यात लोकांनी नेहमीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. चीन आणि इटलीतील माहितीचे उदाहरण देत त्यांनी पीएम २.५ च्या पातळीत वाढ झाल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत ८ ते ९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले होते.'' हवा प्रदुषणामुळे फुफ्फुसांना सुज येते आणि कोरोना व्हायरसही मुख्य स्वरुपात फुफ्फुसांवर परिणाम करतो. अशा स्थितीत गंभीर संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळणं गरजेचं आहे.'' असंही ते म्हणाले होते. सावधान! नाकाला 'ही' २ लक्षणं जाणवत असतील तर असू शकतो कोरोनाचा धोका

Web Title: CoronaVirus : Novel coronavirus can last 28 days on glass currency australian study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.