CoronaVirus News : Study virus attack in asymptomatic patients is dangerous | लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा

लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा

कोरोनाचा प्रसार जगभरात वेगाने वाढत आहे. लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. परंतू काही दिवसांपूर्वी लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना संक्रमणाचा धोका कमी असतो असे स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतू अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सायलेंट किलरप्रमाणे कोरोना परसण्याचा धोका जास्त असतो.

नेचर जर्नल यात प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरात संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार एसिप्टोमॅटिक रुग्णांच्या फुफ्फुसांची अवस्था खराब होते. विशेष म्हणजे फुफ्फुसांचे नुकसान होऊनही खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसून येत नाहीत.  अशा स्थितीत रुग्णांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते. 

भारतात जवळपास ८० टक्के लक्षणं दिसत नसणारे  कोरोना रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात अशा रुग्णांची संख्या ४१ टक्के आहे. अशा रुग्णांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. कारण लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांना त्यांच्या आजाराबाबत कल्पना नसते. परिणामी त्याच्याकडून कमी सावधता बाळगली जाते. या कारणामुळे इतरांपर्यंत संक्रमण पोहोचतं. घरात किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते.

संशोधकांनी लक्षणं दिसत नसलेल्या ३७ रुग्णांची माहिती मिळवून या माहितीवर आधारित संशोधन केले होते. चीनच्या सेंटर फॉर डिसीज एंड प्रिवेंशन संस्थेकडून ही माहिती घेण्यात आली होती. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान कॉन्टॅन्ट ट्रेसिंग आणि तपासणीसाठी २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर अभ्यास करण्यात आला होता. सीटी स्कॅनदरम्यान दिसून आले की, लक्षण नसलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन आणि सुज आली होती. 

परिणामी फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली होती. मोठ्याने हसल्यानंतर किंवा मोठ्याने बोलल्याने सुद्धा कोरोनाचं संक्रमण पसरू शकतं. कारण त्यावेळी लाळेचे ड्रॉपलेट्स सहज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण  झपाट्याने वाढत असल्याचं कारण लक्षणं दिसत नसलेली कोरोना रुग्ण हे असू शकतं. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर आणि मुख्य म्हणजे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करायला हवं.

जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी...

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Study virus attack in asymptomatic patients is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.