शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच रशियाने यशस्वीरित्या लस तयार केल्यानंतर, आता 'या' महिन्यात कोरोनाची लस येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 13:48 IST

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मोठया प्रमाणात लसीवर प्रयोग करण्याआधी पहिल्या तीन टप्प्यातील रिसर्च योग्य होणं गरजेचं आहे.

रशियाच्या ज्या युनिव्हर्सिटीने सगळ्यात आधी कोरोनाची लस तयार करण्याचा दावा केला आहे ती लस ऑगस्टपर्यंत लोकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लहान पातळीवर करण्यात आलेल्या मानवी परिक्षणात ही लस यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मॉस्‍कोच्या सेचेनोव यूनिव्हर्सिटीने (Sechenov First Moscow State Medical University) ३८ स्वयंसेवकांवर मानवी परिक्षण पूर्ण केले आहे. रूसमधील तज्ज्ञांनीही सरकारी गमलेई नॅशनल रिसर्च सेंटरमधील रिसर्च पूर्ण केले आहेत.

वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ही लस 'सिविल सर्कुलेशन' मध्ये असेल. खासगी कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये या लसीचे उत्पादन मोठया प्रमाणावर करण्याची माहिती दिली आहे. गमलेई सेंटरच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची मानवी चाचणी पूर्णपणे सुरक्षित झाली होती. आता ऑगस्टमध्ये रुग्णांना ही लस दिल्यानंतर तिसरा टप्पा सुरू होईल. आधी ज्यांना ही लस देण्यात आली आहे. त्या लोकांवर लक्ष दिले जाईल.

साधारणपणे सुरक्षिततेची पडताळणी करून तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरू होईल. या इंस्टीट्यूटने १८ जूनला ट्रायल सुरू केले. ९ स्वयंसेवकांना एक डोज देण्यात आला. इतर ९ जणांच्या ग्रुपला बुस्टर डोस देण्यात आला. कोणावरही लसीचे साईडईफेक्ट्स दिसून आले नाही. म्हणून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सेचेनोव यूनिवर्सिटीमधील दोन ग्रुप्सना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. २३ जूनला डोज दिल्यानंतर त्यांना २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहायला सांगण्यात आलं आहे.

१८ ते ६५ या वयोगटातील स्वयंसेवकांना ६ महिन्यांपर्यंत निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.रशियातील तज्ज्ञ आता सामान्य लोकांना लस देण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांना कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये त्यांना सगळ्यात पुढे जायचे आहे. अमेरिका, ब्राजील, भारतापेक्षा जास्त  रुग्ण त्या ठिकाणी आहेत. रशियाचे सरकार आणि तज्ज्ञ  ५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या लसींवर काम करत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मोठया प्रमाणात लसीचा प्रयोग  करण्याआधी पहिल्या तीन टप्प्यातील रिसर्च योग्य होणं गरजेचं आहे. आतापर्यंत लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही लसीला मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत रशियातील तज्ज्ञांना वेगाने लसीचा तिसरा टप्पा सुद्धा यशस्वीरित्या पार करायचा आहे. 

खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार

काळजी वाढली! खरंच लस दिल्याने कोरोनापासून बचाव होईल? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यrussiaरशियाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या