CoronaVirus News : घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:04 AM2020-07-12T02:04:16+5:302020-07-12T02:05:09+5:30

आपण बाहेर गेल्यावर लाइटचे बटन, दरवाजे, लिफ्टचे बटन बंद करण्यासाठी प्लॅस्टिकचे आकडेही मिळत आहेत. या आकड्यांनी बटन चालू-बंद करताना ते परत आपण खिशात ठेवणार.

CoronaVirus News: Make a sanitizer spray at home | CoronaVirus News : घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

CoronaVirus News : घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

Next

- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

सध्या सॅनिटायझरशी निगडित अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. यात सॅनिटायझर स्प्रे, सॅनिटायझर पेन हे दोन प्रकार आहेत. आपण बाहेर गेल्यावर लाइटचे बटन, दरवाजे, लिफ्टचे बटन बंद करण्यासाठी प्लॅस्टिकचे आकडेही मिळत आहेत. या आकड्यांनी बटन चालू-बंद करताना ते परत आपण खिशात ठेवणार. त्यामुळे ज्या जागेवर आकडा वापरणार त्याचा संसर्ग शरीरात येणारच म्हणून अशा आकड्यांचा उपयोग नाही. यासाठी घरच्या घरी स्वस्तात सॅनिटायझर स्प्रे बनवता येईल.

१. ३० एमएलची छोटी पुढे निमुळती आणि छिद्र पडण्याची सोय असलेली प्लॅस्टिक बाटली घ्या. ती होमिओपॅथी औषधांच्या दुकानावर सहज मिळते. डॉक्टर या बाटल्यांचा वापर पातळ औषध किंवा मदर टिंक्चरसाठी करतात.
२. ही बाटली अत्यंत स्वस्त असून
५० पैसे ते १ रुपयाला मिळते.
३. बाटलीच्या समोर छिद्रासाठी जागा असते, तिथे टाचणीने छिद्र करावे.
४. या बाटलीमध्ये सॅनिटायझर भरावे.
५. लाइटचे किंवा लिफ्टचे बटन
बंद-चालू करताना या बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या टोकाने बटन दाबा.
६. बटन दाबाल तेव्हा बाटली पण हलकेच दाबली आणि थोडे सॅनिटायझर त्यातून बाहेर येतो.
७. असे करण्याचे तीन फायदे होतील. तुमचा त्या गोष्टीशी संपर्क येणार नाही व इतर व्यक्तीकडून ती जागा संसर्गित झाली असेल तर सॅनिटायझरनेच तुम्ही ती बंद-चालू केल्याने बाटलीचे टोकही संसर्गित होणार नाही. तिसरा फायदा असा की ती जागा सॅनिटाइझर झाल्याने निर्जंतुक झाली म्हणून तुमच्यानंतर स्पर्श करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा धोका नाही.
८. ही बाटली खिशात सहज मावते.
९. कारचे उघडण्याचे हँडल, सार्वजनिक किंवा आॅफिसच्या स्वच्छतागृहाचे दरवाजा उघडण्याचे हँडल अशा कुठल्याही ठिकाणी ही बाटली सहज वापरता येईल.
१०. बाटली शक्यतो खिशातच ठेवावी. आॅफिसमध्ये गेल्यावर टेबलवर किंवा इतरत्र ठेवू नये.

 

Web Title: CoronaVirus News: Make a sanitizer spray at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.