शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

CoronaVirus News : आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:42 AM

CoronaVirus News : सायटोकीन स्ट्रोम्समुळे तरुणांचे जास्त प्रमाणात मृत्यू होतात. अशा परिस्थितीत, रुग्णाला प्रथम तो ठीक असल्याचे जाणवते, परंतु 4-5 दिवसांच्या आत, त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अति सक्रिय होते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

दररोज कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तरुणही बळी पडत आहेत. पहिल्या लाटेत, बहुतेक वृद्ध लोकांना त्याचा फटका बसला होता, परंतु यावेळी तरूण अधिक बळी पडत आहे.  मध्य प्रदेशात गेल्या दीड महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त तरूणांचा समावेश आहे. 

ही लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे आणि वेदना, कोरडे खोकला, सर्दी आणि श्वास लागणे, अशक्तपणा, थकवा येणे, भूक न लागणे, पोटदुखी, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि श्रवण क्षमता कमी होणे यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्यास यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित तपासणी करा. तपासणीस उशीर झाल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

समोर आलं कारण

सायटोकीन स्ट्रोम्समुळे तरुणांचे जास्त प्रमाणात मृत्यू होतात. अशा परिस्थितीत, रुग्णाला प्रथम तो ठीक असल्याचे जाणवते, परंतु 4-5 दिवसांच्या आत, त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अति सक्रिय होते आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्याच वेळी, तरुण चाचण्या करून घेण्यात आणि रुग्णालयात जाण्यात निष्काळजीपणा दाखवतात. त्यामुळे गंभीर स्वरूपात संक्रमण पसरतं. यासह, तरुणांना संसर्ग होण्याचे एक कारण असे आहे की 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण देखील केले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्यासाठी धोका कमी झाला आहे आणि तरुणांमध्ये लसीकरण न झाल्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. 

त्वरित तपासणी करा

लक्षणे दिसताच त्यांची त्वरित तपासणी करा आणि आपल्या स्तरावर उपचार करु नका. तसेच, शरीरात कोणतेही बदल किंवा नवीन लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याने संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो.

कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार

 १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. १ मेपर्यंत देशातील बाजारपेठेत कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. या लसीची किंमत काय असणार याबद्दलचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. यापुढे राज्य सरकारं थेट कंपन्यांकडून कोरोना लसींची खरेदी करू शकतात. 

पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा 'कडक' लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चा

१८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येईल. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. कोविन ऍप किंवा आरोग्य सेतु ऍपवर तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. त्यासाठी ऍपवर आवश्यक माहिती भरून तुमचं ओळखपत्र अपलोड करावं लागेल. तुम्ही लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करू शकता. रुग्णालयं, लसीकरण केंद्रांवर गेल्यावरही नोंदणी करता येऊ शकते. पण तिथे गर्दी असण्याची शक्यता असल्यानं ऑनलाईन नोंदणी हा चांगला पर्याय आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्टसारख्या वैध ओळखपत्रांच्या आधारे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या