CoronaVirus News : तरूणांसाठी जीवघेणा ठरतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; 'या' ६ जागांपासून वेळीच लांब राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:58 AM2021-04-15T11:58:11+5:302021-04-15T12:12:26+5:30

CoronaVirus News & Latest Updates : आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही बाहेर जाण्यापासून रोखायला हवं.  खासकरून अशा ठिकाणी जिथं संक्रमणाचा धोका जास्त असतो, तिथे जाणं टाळायला हवं.

CoronaVirus News : Coronavirus protect your kids from these 6 most risky places | CoronaVirus News : तरूणांसाठी जीवघेणा ठरतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; 'या' ६ जागांपासून वेळीच लांब राहावं लागणार

CoronaVirus News : तरूणांसाठी जीवघेणा ठरतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; 'या' ६ जागांपासून वेळीच लांब राहावं लागणार

googlenewsNext

भारतात कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन तरूण आणि लहान मुलांसाठी जास्त धोकादायक ठरत आहे. वयस्कर लोकांसह तरूण आणि लहान मुलांमध्येही संक्रमणाचं प्रमाण प्रचंड वाढत  आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणांनी आधीपेक्षा जास्त सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गरज नसताना बाहेर जाणं टाळा, आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही बाहेर जाण्यापासून रोखायला हवं.  खासकरून अशा ठिकाणी जिथं संक्रमणाचा धोका जास्त असतो, तिथे जाणं टाळायला हवं.

स्विमिंग पूल-

उन्हाळा सुरू होताच  काही पालक आपल्या मुलांना स्विमिंग क्लासेसमध्ये पाठवतात.  सध्याचे संकट पाहता मुलांना स्विमिंग क्लासेसमध्ये पाठवणं टाळायला हवं. शक्य असल्यास मुलांना घरच्याघरी कोणत्याही कामात व्यस्त ठेवा.

स्पोर्ट्स कॉम्पलेक्स-

क्रिकेट, फुटबॉल, टेनिस किंवा कोणत्या अन्य एक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेत असल्यांनीही काही दिवस लांब राहायला हवं. लक्षात ठेवा की तुम्ही फक्त संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे नाही तर कोणत्याही संक्रमित भागाला  स्पर्श केल्यासही संक्रमित होऊ शकता.

लग्न, इतर कार्यक्रम-

लॉकडाऊनच्या काळात  सरकारकडून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणं, मास्क लावणं, वैयक्तिक स्वच्छता यांकडे लक्ष द्यायला हवं. 

 लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल

मॉल किंवा मार्केट-

शॉपिंगसाठी मॉल किंवा मार्केटमध्ये गर्दी करणं टाळा.  अशा जागेवर रोज लाखो लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका जास्त असतो. म्हणून लहान मुलांना घरीच राहूद्या. शक्य असल्यास ऑनलाईन शॉपिंग करा.

जीम किंवा फिटनेस सेंटर

जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये ३० किंवा त्यापेक्षा कमी वयाचे लोक जास्त पाहायला मिळतात. संसर्ग टाळण्यासाठी जीमला जाण्यपेक्षा घरच्याघरी व्यायाम करा. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार पाहून ते करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. 

भारतात ४ ते ६ परदेशी कोरोना लसी येणार; जाणून घ्या किंमत किती असणार

पार्क किंवा मैदान

अभ्यासाबरोबरच खेळणं, मस्ती करणंसुद्धा गरजेचं आहे. पण सध्याच्या काळात खेळण्यासाठी   बाहेर जाणं महागात पडू शकतं.  म्हणून घरच्याघरी व्यायाम करण्याचा, खेळण्याचा प्रयत्न करा. पार्क किंवा खेळाच्या मैदानात गर्दी केल्यास मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता असते. 

Web Title: CoronaVirus News : Coronavirus protect your kids from these 6 most risky places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.