CoronaVirus News : Corona virus will be destroyed by bacteria in mosquitoes myb | 'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा

'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा

कोरोना व्हायरसच वाढतं संक्रमण लक्षात घेता औषध किंवा लस शोधण्यासाठी सगळ्यात देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. याच दरम्यान चीन आणि अमेरिकेतील संशोधकांनी मिळून एका अशा बॅक्टेरियाचा शोध लावला आहे.

जो बॅक्टेरिया खास प्रोटिनची निर्मीती करतो. या प्रोटीनमध्ये कोरोना व्हायरस व्यतिरिक्त डेंग्यु, एचआईव्ही सारख्या व्हायरसला नष्ट करण्याची क्षमता असते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एंटी व्हायरल ड्रग तयार करण्यासाठी या प्रोटीन्सचा वापर केला जातो.

हेल्थ जर्नल BioRxiv मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार एडीज एजिप्टी नावाच्या डासांच्या प्रजातीमध्ये हे बॅक्टेरिया असतात. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार  बॅक्टीरियाच्या जीनोम सीक्वेंसचे परिक्षण करून त्यातून मिळत असलेल्या प्रोटीनची ओळख केली जाईल. या प्रोटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसला मारण्याची क्षमता असते. 

संशोधकांनी शोधलेल्या बॅक्टेरियाचं नाव लाइपेज एंजाइम असं आहे. लायपेज आणि प्रोटीन व्हायरसला निष्क्रिय करण्याासाठी परिणामकारक ठरत आहे. २०१० मध्ये सुद्धा संशोधन करण्यात आलं होतं. त्यात असं दिसून आलं होतं की,  लिपोप्रोटीन लाइपेज नावाचे केमिकस हेपेटाईटिस-सी व्हायरसला निष्क्रिय करण्यासाठी परिणामकारक ठरते. 

 २०१७ मध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, नाजा मोसाम्बिकाच्या एका सापाच्या विषात सुद्धा फॉस्फो लाइपेज प्रोटीन मिसळलेले आहे. यात हेपेटाइटिस-सी, डेंग्यू आणि जापानी इन्सेफेलाइटिसला निष्क्रिय करण्याची क्षमता असते.  मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संशोधनानुसार कोरोना व्हायरस फुफ्फुसांमध्ये दीर्घकाळापर्यंत लपलेला राहू शकतो. चीनमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये ७० दिवसांनंतरही रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत.

साउथ कोरिया, मकाऊ, ताइवान, व्हिएतनाममध्येही अशा घटना समोर आल्या आहेत. या रिसर्चमध्ये बीजिंगच्या शिंघुआ युनिव्हरसिटी एकेडमी ऑफ मिलिट्री मेडिकल साइंस आणि शेंजेन डिसीज प्रिवेंशन एंड कंट्रोल सेंटरचे संशोधक सहभागी होते. याव्यतिरिक्त अमेरिकेतील कनेक्टिकट युनिव्हरसिटीचे संशोधक सुद्धा होते.

परदेशातून आलेल्या लोकांना फक्त कोरोनाच नाही; तर 'या' ८ व्हायरसचा असू शकतो धोका

'या' आजाराचं कारण ठरू शकतं पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Corona virus will be destroyed by bacteria in mosquitoes myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.