चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी जाता येणार आहे. तुम्हाला कल्पनाही नसेल पण परदेशातून आलेल्या लोकांना कोरोनाच नाही तर श्वसनाशी निगडीत आठ गंभीर आजारांचा धोका असू शकतो. हा खुलासा भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातून करण्यात  आला आहे. 

केरळ आणि पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या संशोधकांनी जानेवारी ते फेब्रुवारीच्या काळात भारतात आलेल्या ३६२ लोकांच्या नमुने एकत्र करून संशोधन सुरू केले त्यातील ८४ लोक हे संक्रमित होते. ज्यात फक्त काही लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

बाकीच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाच्या आजारासंबंधी व्हायरसची लक्षणं दिसून आली. २२्र जानेवारी  ते २९ फेब्रुवारीदरम्यान ३६२ लोकांचे नमुने वेगवेगळ्या विमानतळांवर स्क्रिनिंगदरम्यान घेण्यात आले होते. यांची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात २ केरळ मधील आणि १ दिल्लीतील रहिवासी संक्रमित आढळून आला. चार देशातील कोरोना संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परत आले होते.

इतर लोकांमध्ये इन्फुएंजा, कोरोना व्हायरसस रायनोव्हायरस, एडिनो आणि पॅरा इन्फ्लुएंजा व्हायरसची लक्षणं दिसून आले. ८४ लोकांमध्ये एकापेक्षा जास्त श्वसनाशी जोडलेले व्हायरस दिसून आले. तर  २७८ निगेटिव्ह रुग्ण  होते. परदेशातून आलेल्या रुग्णांमध्ये हे मुख्य व्हायरस दिसून आले होते. 

इनफ्लुएंजा ए या आजारात २५ प्रवाश्यांमध्ये हा व्हायरस दिसून आला. या आजाराला फ्लू असं सुद्धा म्हणतात. यामुळे माणसाच्या श्वसनतंत्रावर परिणाम होतो. तसंच  इनफ्लुएंजा बी या व्हायरसचं संक्रमण ७ लोकांना झालं होतं.

२१ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. जगभरात ७ प्रकारच्या कोरोना व्हायरस दिसून आले आहेत.  परदेशातून आलेल्या १५ लोकांमध्ये रायनो हा व्हायरस दिसून आला होता. कोरोना व्हायरसप्रमाणे ५ ते ७  दिवसांनी व्हायरसची लक्षणं दिसून येतात.

एडीनो व्हायरस चार लोकांमध्ये दिसून आला. सर्दी, खोकला,  ताप अशीच या व्हायरसची लक्षणं आहेत.  पॅरा इन्फलुएंजा (पीआईवी) हे संक्रमण १० लोकांना झालं होतं. आरएसवी हा श्वसनाशी जोडलेला आजार असून ६ लोकांमध्ये दिसून आला.  त्यात श्वास घेण्याची समस्या दिसून आली. मॅटानिमो मॅटाफिनोमी व्हायरसचे दोन रुग्ण मिळाले. 

कोरोनाशी लढण्यासाठी फुफ्फुस चांगली असणं आवश्यक; 'या' ५ मिनिटांच्या व्यायामाने राहा निरोगी

'या' आजाराचं कारण ठरू शकतं पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: People who came from abroad to india bring 8 other viruse related to respiration myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.