CoronaVirus News : Big bang for Russia! India denies permission to test Russian vaccine | रशियाला मोठा दणका! रशियन लसीच्या मोठ्या स्तरावरील चाचणीसाठी भारतानं नाकारली परवानगी

रशियाला मोठा दणका! रशियन लसीच्या मोठ्या स्तरावरील चाचणीसाठी भारतानं नाकारली परवानगी

कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. इतर देशांमध्ये तयार झालेल्या लसीच्या चाचण्या भारतात सुरू होणार असल्याची चर्चा होती. रशियन कोरोना लसीच्या मोठ्या स्तरावर चाचण्या भारतात सुरू होतील अशी माहिती काही दिवसांपूर्वी सरकारकडून देण्यात आली होती. रशियाची कोरोनाची लस ही जगातील पहिली यशस्वीरित्या तयार झालेली कोरोना लस असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून होती. लसीबाबत हा दावा केल्यानंतर भारतातील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियासोबत एक करार केला होता.  पण भारत सरकारकडून आता रशियाच्या लसीच्या चाचण्यांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) सुरुवातीला या लसीच्या लहान स्तरावरील चाचणीसाठी मंजुरी दिली होती. आता  सीडीएससीओचे तज्ज्ञांच्या  एका गटाचे म्हणणे आहे की, परदेशात स्पुटनिक व्ही या लसीच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये सुरक्षा आणि इम्यूनोजेनेसिटीबद्दल कमी प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे. यात भारतीय स्वयंसेवकांचे कोणतेही इनपुट्स मिळाले नाही. 

रूस के साथ भारत का करार

रशियात लसीचे परिक्षण सध्या परिक्षण सुरू असून लवकरच या लसीचे परिणाम दिसून येतील. भारतात या लसीच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंड (RDIF) आणि डॉक्टर रेड्डीज लॅब यांच्यामध्ये मागच्या काही महिन्यात रशियाच्या लसीचे वैद्यकिय चाचणी आणि वितरण याबाबत एक करार झाला होता. रशिया असा पहिला देश आहे. ज्याठिकाणी कोरोना व्हायरसच्या लसीची रेग्यूलेटरी मंजूरी मिळाली होती.  दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

 चाचणी संपायच्या आधीच  रशियात लसीकरणाला सुरूवात झाली. रशियाने लसीबाबत हे पाऊल उचलल्यानंतर संपूर्ण जगभरात डॉक्टरर्स आणि वैज्ञानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. स्पुटनिक वी लस उपलब्ध केल्यानंतर आता अजून एक लस लॉन्च करण्याची तयारी रशियाने केली आहे.  रशियाच्या या लसीचे नाव एपीवॅकोरोना असे आहे. क्लिनिकल ट्रायलसाठी ही लस यशस्वी ठरू शकते. १५ ऑक्टोबरला ही लस लॉन्च केली जाऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे. लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

स्पुटनिक-V लसीच्या शेवटच्या चाचणीत रशिया बाजी मारणार?

स्पुटनिक व्ही लस तयार करत असलेली कंपनी गॅमलेया इंस्टिट्यूटचे प्रमुख अलेक्जेंटर गिंट्सबर्ग यांनी रॉयटर्सला याबाबत माहिती दिली होती. गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार  लस तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग असणं गरजेचं आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. लसीचे डोज  दिलेल्या  ४० हजार वॉलेंटिअर्सना १८० दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात या लसीचे कोणतेही साईट इफेक्टस दिसून आलेले नाहीत. 

या लसीच्या पहिल्या चाचणीचे परिणाम वैद्यकिय नियतकालिक लँसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ४०० लोकांना  ही लस देण्यात आली होती. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वयस्कर लोकांना लसीकरण अभियानात सहभागी करून घ्यायचं  की नाही याचा निर्णय तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल आल्यानंतरच  घेतला जाणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Big bang for Russia! India denies permission to test Russian vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.