लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 07:46 PM2020-10-07T19:46:54+5:302020-10-07T19:55:09+5:30

CoronaVirus News & latest Updates : ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

Corona virus 4000 scientists called for life to return to normal herd immunity | लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

googlenewsNext

कोरोना व्हायरसने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या जगभरातील एकूण ४ हजार  वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या माहामारीबाबत एक आवाहन केलं आहे. एंटी लॉकडाऊन पिटिशनमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

वैज्ञानिकांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसपासून ज्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे. त्या लोकांना वगळता इतरांचे जीवन सर्वसामान्य व्हायरला हवं.'' वयस्कर, लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक, गंभीर आजारांनी पिडीत असलेल्या लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. metro.co.uk च्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड, नॉटिंघम, एडिनबर्ग, कँब्रिज, ससेक्ससह अन्य युनिव्हर्सिटीतील वैज्ञानीकांनी लोकांना सर्व सामान्य जीवन जगण्यासाठी आवाहन केलं आहे.

Coronavirus

कारण सामाजिकदृष्या लोकांवर घालण्यात आलेल्या बंधनांमुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर, आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अन्य काही तज्ज्ञांनी या पिटिशनचा विरोध करत कोरोना व्हायरसमुळे लोकांचे जीवन आणि आरोग्य पूर्णपणे उद्धवस्त होऊ शकतं असं म्हणलं आहे. तसंच हर्ड इम्यूनिटी तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पेटिशनमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे लोकांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

वैज्ञानिकांनी पिटीशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार लोकांवर घातलेल्या अन्य बंधनांमुळे मृत्यूदर वाढू शकतो. तसंच मुलांना शाळांपासून दूर ठेवणं अन्यायकारक आहे.  जोपर्यंत लस येत नाही  तोपर्यंत अशीच बंधनं घालून ठेवली तर मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून समााजातील मागास घटकांचे यामुळे जास्त नुकसान होऊ शकते.  दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

२०२१ च्या जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली होती. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाची लस कधी  येणार याची  सविस्तर माहिती दिली होती. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. ....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

साधारणपणे भारतातील  २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं होतं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स

Web Title: Corona virus 4000 scientists called for life to return to normal herd immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.