शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

CoronaVirus News: अशीही केली जाते ओमायक्रॉन टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 09:18 IST

जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओमायक्रॉनची चाचणी केली जाते. परंतु व्हेरिएंटच्या प्रसारवेगापुढे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआरमधूनही ओमायक्रॉनची चाचणी केली जाऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्क : देशात सध्या ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे. जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओमायक्रॉनची चाचणी केली जाते. परंतु व्हेरिएंटच्या प्रसारवेगापुढे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआरमधूनही ओमायक्रॉनची चाचणी केली जाऊ शकते.आरटी-पीसीआर चाचणीसर्वप्रथम व्यक्तीच्या घसा अथवा नाकाच्या माध्यमातून स्वॅब घेतले जातात. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.स्वॅबचे नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात.त्यातून व्यक्तीला बाधा झाली आहे किंवा कसे, हे निश्चित होते. त्यानंतर नमुन्यात एस-जीन आहेत का, हे पाहिले जाते.भारतात : ओमायक्रॉन चाचणीपरदेशातून आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.अहवाल पॉझिटिव्ह आल्यास स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठवितात.प्रयोगशाळेत या नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाते.त्यांचा अहवाल आल्यानंतरच ओमायक्रॉनबाबतचे चित्र स्पष्ट होते.जिनोम सिक्वेन्सिंग खर्चीकओमायक्रॉन व्हेरिएंटचा छडा लावण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जाते.परंतु जिनोम सिक्वेन्सिंग ही खर्चीक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे.जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल येण्यास वेळ लागतो आणि त्यामानाने संसर्गाचे प्रमाण वाढलेले असते.आरटी-पीसीआरच्या माध्यमातूनही ओमायक्रॉनचा तपास लागू शकतो. ही चाचणी अवघ्या अडीचशे रुपयात उपलब्ध आहे.एस-जीन नसणे म्हणजे ओमायक्रॉनबाधितविषाणूत उपस्थित असलेल्या एस-जीनच्या माध्यमातूनच ओमायक्रॉनची पुष्टी केली जाते.एखाद्याच्या स्वॅब नमुन्यात एस-जीन नसल्यास संबंधित व्यक्ती ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट होते.एस-जीन उपस्थित असूनही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यास अन्य व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समजतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन