CoronaVirus News : डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी १७५ किमी ग्रीन कॉरिडोर; एअर एम्ब्युलन्सनं हैदराबादला पाठवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:17 PM2021-04-19T20:17:48+5:302021-04-19T20:22:14+5:30

CoronaVirus News : डॉक्टर सत्येंद्र मिश्रा यांना कोरोनामुळे फुफ्फुसात जास्त संक्रमण झाले आहे.

CoronaVirus News : 175 km long green corridor built to save doctor life in madhya pradesh air ambulance-sent to hyderabad | CoronaVirus News : डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी १७५ किमी ग्रीन कॉरिडोर; एअर एम्ब्युलन्सनं हैदराबादला पाठवलं

CoronaVirus News : डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी १७५ किमी ग्रीन कॉरिडोर; एअर एम्ब्युलन्सनं हैदराबादला पाठवलं

Next

महाराष्ट्राप्रमाणेच भारतातील  इतर राज्यात कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. मध्यप्रदेशातील  बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये तैनात असलेले डॉ. सत्येंद्र मिश्रा यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारने सर्व शक्ती पणाला लावली आहे. डॉक्टर सत्येंद्र मिश्रा यांना कोरोनामुळे फुफ्फुसात जास्त संक्रमण झाले. मध्य प्रदेशमध्ये उपचार शक्य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज यांच्या सूचनेनुसार सागर जिल्हाधिकारी यांनी डॉ. मिश्रा यांना एअर एम्ब्युलन्सने हैदराबाद येथे उपचारासाठी पाठवले.

 पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

उपचारासाठी डॉक्टरांना सागर ते हैदराबाद असा प्रवास करावा लागला. यासाठी हवाई रुग्णवाहिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. एअर एम्ब्युलन्सने भाडे 18 लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. प्रथम पैसे देण्याची मागणी करण्यात आली. रविवार असल्याने बँक बंद होती, पण बँक ओपन ट्रान्सफर केल्याशिवाय एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत सागर जिल्हाधिकारी यांनी बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेची विशेष परवानगी घेऊन सागरमध्ये बँक उघडली. त्यानंतर एअर एम्ब्युलन्ससाठी पैसे भरण्यात आले.

समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण

त्यानंतर हैदराबादहून डॉक्टरांची टीम एअर एम्ब्युलन्ससह भोपाळला पोहोचली. येथून, डॉक्टरांची एक विशेष पथक रस्त्यामार्गे विशेष रुग्णवाहिकेतून सागरच्या भाग्योदय रुग्णालयात दाखल झाले.  त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने सागरमध्येच तपासणी केली. सागर जिल्हाधिकारी दीपक सिंह म्हणाले की, ''डॉ.सतेंद्र मिश्रा यांची तपासणी केल्यानंतर हैदराबादहून डॉक्टरांची टीम सोमवारी सकाळी विशेष एम्ब्युलन्ससह भोपाळला पहाटे 5:00  वाजता निघाली.''

भाग्योदय हॉस्पिटल ते भोपाळ विमानतळ असा 175 किमी लांबीचा ग्रीन कॉरीडोर रोड बांधला गेला. पोलिस कर्मचाऱ्यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भोपाळ विमानतळावरून ते हैदराबादला रवाना झाले आहेत. आता तिथेच त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus News : 175 km long green corridor built to save doctor life in madhya pradesh air ambulance-sent to hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.