अति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:24 AM2021-01-27T11:24:27+5:302021-01-27T11:33:11+5:30

CoronaVirus News & Latest news : संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार धुम्रपान कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत ठरते. 

Coronavirus new study suggests heavy smokers 89 percent more likely to die with covid-19 | अति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा

अति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा

Next

धूम्रपान आरोग्यासाठी  हानीकारक असते कारण धुम्रपान अधिक प्रमाणात करणं हे फुफ्फुसांच्या  कॅन्सरचे कारण ठरू शकते.  नवीन संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार अधिक धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये कोरोनामुळे वाढणारा मृत्यूचा धोका वाढत आहे. माहामारीच्या सुरूवातीला ब्रिटनमधील मुख्य चिकित्स सल्लागार प्राध्यापक क्रिस व्हिट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही धुम्रपान सोडण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. याशिवाय मॅट हॅनकॉक यांनीही याबाबत धोक्याची सुचना दिली आहे. पहिल्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार धुम्रपान कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत ठरते. 

ओहिओ आणि फ्लोरिडाच्या क्वीवलँड क्लिनिकमधील  ७ हजारांपेक्षा जास्त कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर परिक्षण करण्यात आलं होतं. ज्यात  ३० वर्षांपेक्षा अधिक वर्षांपर्यंत धुम्रपान करणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने धुम्रपान न करणाऱ्याच्या तुलनेत जास्त होती. धुम्रपानामुळे कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता  ८९ टक्क्यांनी वाढली होती. यापूर्वी, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या १०२ रुग्णांवर एक छोटासा अभ्यास देखील केला गेला ज्याला असे आढळले की ३० वर्ष धूम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत २० वर्षांपासून धूम्रपान करणार्‍यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होते.

धूम्रपान केल्याने कर्करोग, हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसांच्या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हे विकार अधिक तीव्र कोरोना संक्रमणाच्या गुंतागुंतांशी संबंधित आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की धूम्रपान देखील रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम करते ज्यामुळे संक्रमणास लढा देणे कठीण होते. गंभीर प्रकरणांमध्ये, कोरोना विषाणू फुफ्फुसांमध्ये श्वसनमार्गापासून एअर सॅक पर्यंत पसरतो, जिथे गॅसची देवाणघेवाण होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा

अखिल भारतीय सेरो सर्वेक्षणकडून नुकताच अहवाल आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की धूम्रपान करणार्‍यांना आणि शाकाहारी लोकांना कमी सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली आहे आणि ते कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी असल्याचे दर्शवितात. हा अभ्यास १० हजार ४२७  लोकांवर घेण्यात आला. या सर्वेक्षणात असेही आढळले आहे की 'ओ' रक्तगटातील लोकांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते, तर 'बी' आणि 'एबी' रक्तगटातील लोकांना जास्त धोका असतो. Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

Web Title: Coronavirus new study suggests heavy smokers 89 percent more likely to die with covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.