शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 2:21 PM

CoronaVirus News & Latest Updates : शुक्राणूंवर होणारे हे परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित आहेत.

कोरोना व्हायरसनं गेल्या एका वर्षापासून कहर केला आहे. अजूनही कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं संशोधनातून समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या प्रभावामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष पुरावे सापडले आहेत. कोरोनामुळे प्रजनन प्रणालीला नुकसान पोहोचू शकते. रिप्रोडक्शन या वैद्यकीय पत्रकात याबाबत अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 

पुरुषांमधील प्रजननक्षमतेवर विषाणूचा परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी १०५  निरोगी आणि कोरोना संक्रमित  पुरुषांच्या ८४ शुक्राणूंच्या सॅम्पलवर अभ्यास केला गेला. जर्मनीतील जस्टस लायबिग विद्यापीठाचे संशोधक बेहजाद हजीजादे मालेकी म्हणाले, ''शुक्राणूंवर होणारे हे परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित आहेत. कालांतराने हे प्रभाव सुधारले असले तरी कोविड -१९ मधील रूग्णांमध्ये ते लक्षणीय प्रमाणात दिसून आले. कोरोनाचा त्रास जेवढा तीव्र असेल तितके मोठे बदल होत आहेत.''

संशोधक बेहजाद हाजीजादे मालेकी म्हणाले की, ''पुरुष प्रजनन प्रणालीला 'कोविड -१९ संसर्गाचा धोका हा संवेदनशील मुद्दा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील उच्च जोखीम घोषित करायला हवी.'' तथापि, यावर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, ब्रिटनमधील केअर फर्टिलिटी ग्रुपमधील भ्रूणविज्ञानाचे संचालक एलिसन कॅम्पबेल म्हणतात की, ''पुरुषांनी अनावश्यक काळजी करू नये. कोविड -१९ मुळे शुक्राणूंची गुणवत्ता किंवा पुरुषांची प्रजनन क्षमतेचे कायमचे नुकसान होण्याचे निश्चित पुरावे सध्या सापडलेले नाहीत.''शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक

अलीकडेच ‘ओपन बायोलॉजी’ या जर्नलमध्येही एक संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर कोरोना विषाणूचा नकारात्मक प्रभाव पडतो, कारण हा विषाणू पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक प्रभावीपणे हल्ला करतो. तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या