coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 10:37 AM2020-09-14T10:37:23+5:302020-09-14T10:38:30+5:30

देशातील कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली असतानाच कोरोना विषाणूबाबत अजून चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

coronavirus: New dangerous form of 'polymorphic' corona, platelets falling suddenly like dengue | coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे

coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे

googlenewsNext
ठळक मुद्देआता कोरोनाच्या रुग्णांमध्ये डेंग्युप्रमाणे प्लेटलेट्स कमी होत असल्याचे आले समोर सर्वसाधारणपणे डेंग्यूच्या आजारामध्ये ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतातकोरोनाबाधित रुग्णांच्या प्लेटलेट्स अचानक घटून २० हजारांहून कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे

नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या काही दिवसांपासून अधिकच गंभीर रूप धारण केले आहे. देशातील कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली असतानाच कोरोना विषाणूबाबत अजून चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोना विषाणूने रूपांतर केले असून, आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये डेंग्युप्रमाणे प्लेटलेट्स कमी होत असल्याचे समोर आले आहे.

सर्वसाधारणपणे डेंग्यूच्या आजारामध्ये ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. मात्र आता हे लक्षण कोरोनाच्या रुग्णांमध्येही दिसू लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्लेटलेट्स अचानक घटून २० हजारांहून कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र संबंधित रुग्णाची डेंग्यूची चाचणी केल्यास त्यामध्ये संबंधित रुग्णास डेंग्यू नसल्याचे समोर येत आहे. तसेच असे रुग्ण हे आजार गंभीर अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर सापडत आहेत.

याबाबत पीजीआयचे प्राध्यापक अनुपम वर्मा यांनी सांगितले की, रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये अचानक मोठी घट होत असल्याने अशा रुग्णाची प्रकृती स्थिर राखणे कठीण होत आहे. पीजीआयमध्ये दाखल झालेल्या लोकबंधू रुग्णालयामधील एका डॉक्टरच्या प्लेटलेट्स भरती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दहा हजारांवर पोहोचल्या होत्या.

कोरोना विषाणू रुग्णांचा इम्युन कॉम्प्लेक्स बिघडवत आहे. त्यामध्ये मोनोसाइड आणि मॅकरोफेज सेलवर हल्ला होत आहे. यामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची गरज वाढत आहे. मात्र त्याची शरीरामधील निर्मिती आधीपेक्षा कमी होते. त्यामुळेच प्लेटलेट्स काऊंट अचानकपणे कमी होत आहे. अशा रुग्णांची प्रकृती बहुतकरून गंभीर असते. त्यांना प्लेटलेट्स दिल्या जातात. तसेच गरज पडल्यास प्लाझ्मा थेरेपीसुद्धा दिली जाते.

या सर्वामुळे आताच्या परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णांची डेंग्यूची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. विशेषकरून ज्या रुग्णांच्या प्लेटलेट्स काऊंटमध्ये घट होत आहे, अशांची चाचण होणे अधिक आवश्यक आहे. त्यामधून संबंधित रुग्णाला डेंग्यू आहे की कोरोना निश्चित होऊ शकेल. तसेच याबाबत अधिक शोध सुरू आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Web Title: coronavirus: New dangerous form of 'polymorphic' corona, platelets falling suddenly like dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.