आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:31 PM2020-07-02T16:31:41+5:302020-07-02T16:32:40+5:30

CoronaVirus News Latest Update : मास्कप्रमाणे रोज नेकलेसचा वापर करायला हवा. जेणेकरून संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो.

CoronaVirus : Nasa develops a pulse pendant that reminds you not to touch your face | आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस

आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे लाखोंचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस मृतांची आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. नासाने कोरोनापासून बचावासाठी एक अनोखा नेकलेस म्हणजेच गळ्यातील हार तयार केला आहे. जाणून घ्या या गळ्यातील हाराची खासियत काय आहे.

तुम्हाला माहीतच असेल सध्या डॉक्टर सर्वच स्तरातून व्हायरसपासून बचावसाठी सतत आपले हात साबणाने धुण्याचा सल्ला देत आहेत. याशिवाय आपले तोंड, नाक, कान, डोळे, ओठ या अवयावांना सतत स्पर्शही केला जाऊ नये. या सगळ्या गोष्टींचा विचार करून नासाने एक नेकलेस तयार केला आहे.  या नेकलेसची खासियत अशी आहे की, जर तुम्ही आपल्या तोंडाजवळ हात नेलात तर हा नेकलेस वायब्रेट होऊन तोंडाला स्पर्श न करण्याचा संकेत देणार आहे. 

नासा ने बनाया कोरोना से बचाने वाला नेकलेस

या अनोख्या नेकलेसला नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबने थ्री-डी प्रिंटरच्या साहाय्याने तयार केले आहे.  या नेकलेसच्या आत नाण्याच्या आकाराचं एक यंत्र आहे. यात इंफ्रारेड सेंसर आहे. हा सेंसर १२ इंचापर्यंत कोणतीही वस्तू जवळ आल्यास सुचना देऊ शकतो.  यामध्ये तीन वोल्टची बॅट्री सुद्धा आहे. जेट प्रोपल्शन लॅबने दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी हा नेकलेस फायदेशीर ठरू शकतो. 

आता सगळेच लोक हळूहळू आपल्या कामावर रुजू होत आहेत. अशा स्थितीत हा नेकलेस परिणामकारक ठरू शकतो. हा नेकलेस जास्त महाग असणार नाही. सहज विकत घेता येऊ शकेल इतकी या नेकलेसची किंमत असेल. याशिवाय हा नेकलेस घातल्यानंतर कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. हा नेकलेस घातल्यानंतर संसर्गाबाबत भीती ठेवण्याचे काहीही कारण नाही. मास्कप्रमाणे रोज नेकलेसचा वापर करायला हवा. जेणेकरून संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो.  या नेकलेसबाबत नासाने अधिक माहिती दिली आहे.

Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण

कोरोना विषाणूंमुळे मेंदूवर होतोय तीव्र परिणाम; 'या' आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत लोक

Web Title: CoronaVirus : Nasa develops a pulse pendant that reminds you not to touch your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.