CoronaVirus News Marathi : Coronavirus effect on mental health and brain damage | कोरोना विषाणूंमुळे मेंदूवर होतोय तीव्र परिणाम; 'या' आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत लोक

कोरोना विषाणूंमुळे मेंदूवर होतोय तीव्र परिणाम; 'या' आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत लोक

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकुळ घातला आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांना या काळात प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला होता. कोरोनाच्या माहामारीने आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला आहे. शरीराला नुकसान पोहोचवण्यासोबत कोरोनामुळे आता लोकांच्या डोक्यावरही परिणाम होत आहे. एका सर्वेमधून दिसून आले की,  कोरोना रुग्णांना स्ट्रोक, साइकोसिस आणि डिमेंशिया यांसारख्या  गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

लेंसेट सायकेट्रीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार १२५ कोरोना रुग्णांवर सर्वे करण्यात आला होता.  हे सगळे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूरोसाईक्रियाट्रिक आजाराने ग्रासलेले होते. अभ्यासानुसार जवळपास ५७ रुग्णांना ब्रेन स्ट्रोक, इंसेफेलाइटिस म्हणजेच भ्रम होणं अशा समस्यांचा सामना करावा लागला होता. तर १० रुग्णांना सायकोसिस म्हणजेच मेंदूवर नियंत्रण नसण्याची स्थिती उद्भवली होती. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार स्ट्रोकची समस्या साधारणपणे वयस्कर लोकांमध्ये दिसून आली. मानसिक आजारांची लक्षणं ६९ पेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये दिसून आली. 

पालमोनोलॉजी विभागातील डॉ. आशिष जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांमध्ये १२ टक्के रुग्णांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. संशोधनातील माहितीनुसार ब्लड क्लॉटींगची समस्या सुद्धा उद्भवत आहे. दरम्यान कोरोनाकाळात कोरोनाबाधित नसलेल्या लोकांनाही लॉकडाऊन दरम्यान मानसिक ताणाचा सामन करावा लागला होता. नोकरी, आर्थिक गोष्टींचा ताण आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते.

आता कोरोनाची बाधा झाल्यास सर्दी, उलट्या, अतिसाराचा त्रास होतो. मात्र यात आणखी तीन लक्षणांची भर पडली आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं तीन नव्या लक्षणांचा समावेश केला आहे. त्यात नाक गळणं, पोटात ढवळणं, उलट्या यांचा समावेश आहे. याआधी कोरोनाची ९ लक्षणं आढळून आली आहेत. त्यात ताप, सुका खोकला, श्वासोच्छवासात अडचणी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाची चव जाणं, घशात खवखव यांचा समावेश आहे.

खुशखबर! 'या' औषधांच्या मिश्रणाने कोरोनाचा खात्मा होणार; रोगप्रतिकारकशक्तीही वाढणार

CoronaVirus : 'या' कंपनीच्या लसीच्या चाचणीला मोठं यश ; ९४ टक्के लोकांमध्ये सकारात्मक परिणाम

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News Marathi : Coronavirus effect on mental health and brain damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.