Coronavirus information difference between normal flu and covid-19 symptoms coronavirus | थंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

थंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत  जगभरात २ कोटींपेक्षा जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १० लाख  १२ हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या सात ते आठ महिन्याांपासून हाहाकार पसरवत असलेली कोरोनाची माहामारी आटोक्यात यायला तयार नाही. त्यामुळे  दैनंदिन  जीवन जगत असताना लोकांना कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. वातावरणातील बदल किंवा ऋतू बदलल्यानंतर अनेकांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत कोविड १९ चे संक्रमण  की नॉर्मल फ्लू आहे. यातील फरक ओळखणं कठीण असतं. म्हणूनच  कोरोना आणि थंडीमुळे येणारा ताप यातील फरक कसा ओळखायचा हे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दिल्लीतील सफरजंग रुग्णालयातील वरिष्ट डॉक्टर एम के सेन यांनी  सांगितले, ''कोरोना आणि सामान्य फ्लू, इंफ्लूएंजा व्हायरसमध्ये खूप साम्य आहे. यो दोन्ही आजारात  ताप येणं, खोकला, शिंका येणं अशी लक्षणं दिसून येतात. चाचणी केल्यानंतर कोरोना आहे की नाही याची माहिती मिळवता येऊ शकते. रुग्णालयात जाऊन तुम्ही एंफ्लूएंजा व्हायरस आणि कोरोनाची तपासणी करू शकता.  रोजचं काम करत असताना तोंडावर हात जाणं स्वाभाविक आहे. पण मास्क लावला असेल तर आजारा पसरण्याचा धोका टळू शकतो. सॅनिटाजर लावल्यानंतर  लगेच हात तोंडाजवळ नेऊ नका. कारण सॅनिटाजर फक्तवेळ तुमच्या हातांना राहतं. सुकल्यानंतर तुम्ही इतर ठिकाणी स्पर्श करू शकता. ''

एम. के. सेन यांनी सांगितले की, ''कोरोनातून बाहेर येत असलेल्या १० टक्के रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. झोप न येणं, चालायला त्रास होणं, अंग गरम असणं. ही लक्षणं दिसून येतात. तुम्हालाही अशी लक्षणं दिसून येत असतील घाबरण्याचे काहीही कारण नाही. समस्या वाढल्यास तुम्ही पोस्ट कोविड रुग्णालयात जाऊ शकता. भरपूर पाणी प्या, झोप पूर्ण घ्या, व्यायाम, ध्यान, प्राणायम, आसनं सुरू करा.''

जयपुर के इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे संचालक के निदेशक डॉ. संजीव शर्मा यांनी सांगितले की, ''सिजनल फळं नेहमी खाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. जर तुम्ही काढयाचे सेवन करत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. काढ्यात  ज्या पदार्थांचा वापर करत आहात त्याचे प्रमाण निश्चित ठेवा. सण उत्सवांच्यावेळी नातेवाईकांच्या घरी  जाऊन भेटण्यापेक्षा त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्या. जसजसं चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे. तसतसे कोरोना व्हायरसचे नवनवीन केसेस समोर येत आहेत. म्हणून दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग पाळणं आणि वैद्यकिय स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. ''

कोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा प्रसार

आयसीएमआर वैज्ञानिकांनी कॅट क्यू व्हायरस (CQV) नावाचा एक विषाणू शोधून काढला आहे. या विषाणूमध्ये देशात रोगाचा प्रसार करण्याची क्षमता आहे. तसेच, हे विषाणू आर्थ्रोपॉड-जनित विषाणूंच्या श्रेणीमध्ये येतात. ते कुलेक्स नावाच्या डासांच्या व्यतिरिक्त डुकरांमध्ये देखील आढळतात. वृत्तानुसार, चीन आणि व्हिएतनाममधील लोक मोठ्या प्रमाणावर या सीक्यूव्ही विषाणूमुळे पीडित असल्याचे आढळले आहे. भारतात सुद्धा सीसीक्यूपासून होणारा रोग पसरण्याची शक्यता आहे.

भारतात दोन लोकांच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आढळले आहेत. आयसीएमआरच्या वैद्यकीय जर्नल आयजेएमआरच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही नमुने कर्नाटकात २०१४ आणि २०१७ मध्ये घेण्यात आले होते. आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, जर हा विषाणूचा प्रसार झाला तर सार्वजनिक आरोग्यावर संकट उद्भवू शकते.

दोन्ही व्यक्तींच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीसीक्यू आयजीजी अँटीबॉडीज सापडल्यावर डासांमधील सीक्यूव्हीच्या रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढविण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली. संशोधकांच्या मते, हे सूचित करते की, भारतात सीक्यूव्ही-जनित रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बचावात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना सीरमच्या नमुन्यांची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus information difference between normal flu and covid-19 symptoms coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.