शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

संक्रमणानंतर 'एवढ्या' महिन्यांनंतरही इम्यूनिटी ठरतेय प्रभावी, नव्या रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 1:17 PM

CoronaVirus News & latest Updates : एका नव्या रिसर्च रिपोर्टने रोगप्रतिकारकशक्तीबाबत दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे. १०० लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात सगळ्याच लोकांच्या शरीरात टी सेल्स रेस्पांस जनरेट झाला होता.

कोरोना व्हायरसच्या माहामारीत आतापर्यंत  कोणत्याही लसीचा शोध लागलेला नाही, रोगप्रतिकारकशक्ती कोरोनाशी सामना कशी करते, हे पाहण्यासाठी संशोधकाचे सध्या नवीन संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असलेल्या पेशी संक्रमणानंतर कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते. एका नव्या रिसर्च रिपोर्टने रोगप्रतिकारकशक्तीबाबत दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे. १०० लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात सगळ्याच लोकांच्या शरीरात टी सेल्स रेस्पांस जनरेट झाला होता. जे कोरोना व्हायरस प्रोटीन्सची चेन पूर्ण करण्यासाठी तसंच लढण्यासाठी सक्षम असतात. त्यात एका स्पाईक प्रोटीन्सचाही समावेश होता. 

लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये ५० टक्के जास्त इम्यूनिटी असते

इंग्लँडमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं होती. त्यांच्यातील पेशींची संख्या लक्षण नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत ५० टक्के जास्त होती. आतापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती कितीवेळ राहू शकते याबाबत माहिती स्पष्ट झालेली नाही. सहा महिने  हा रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्याचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा काळ आहे. तरीसुद्धा काही रुग्णांना एकदा संक्रमण झाल्यानंतर पुन्हा संक्रमणाचा सामना करावा लागला होता. 

यूकेच्या मेडिकल रिसर्च काउंसिलचे प्रमुख फियोना वाट यांनी सांगितले की, व्हायरसच्या इन्फेक्शनपासून मजबूत टी सेल्स तयार होतात. म्हणजेच लस दिल्यानंतरही असा परिणाम दिसू शकतो. T सेल्‍स ऐंटीबॉडीज नसतात. त्या  पांढऱ्या पेशी असतात. ज्यामुळे मागच्यावेळी आलेलं आजारपण लक्षात ठेवून पुन्हा येत असलेल्या आजारांशी सामना केला जातो. गरजेच्यावेळी एंटीबॉडी सक्रिय केल्या जातात.  १७ वर्षांपूर्वी सार्स कोविडची माहामारी पसरली होती. ती सुद्धा कोरोना व्हायरसप्रमाणेच होती. जे लोक सार्सने संक्रमित झाले होते. त्याच्यात व्हायरसशी लढत असलेले टी सेल्स आतापर्यंत आहेत.  

कोरोनाचं नवं रूप ठरतंय घातक; ८५ टक्के रुग्णांमध्ये नवीन व्हायरस स्ट्रेनचा प्रसार

अमेरिकेतील टेक्सासच्या एका रुग्णालयात दाखल झालेल्या ५ हजार कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या एका परिक्षणादरम्यान दिसून आले की, जवळपास ९९.९ टक्के केसेस कोरोनाचे रुप बदलल्यामुळे दिसून आल्या आहेत. म्हणजेच D614G व्हायरसचं हे रूप यासाठी जबाबदार आहे.  कोरोना व्हायरसचं नवीन रूप मूळ व्हायरसच्या रुपापेक्षा जास्त संक्रामक आणि भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. या रिसर्चसाठी  तज्ज्ञांनी जवळपास ५ हजार रुग्णांमधील कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचे विश्लेषण केले होते. सगळ्यात आधी युरोपात कोरोना व्हायरसचा D614G स्ट्रेन पसरण्याची माहिती समोर आली होती. 

पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या D614G स्ट्रेनबाबत माहिती मिळाली होती. नंतर हा स्ट्रेन  अमेरिका आणि इतर आशियाई देशांमध्ये काही आठवड्यातच पसरला.  वैज्ञानिक आता  SARS-CoV-2 चे हे रूप मोठ्या प्रमाणात  वेगाने पसरत आहे का, याचा शोध घेत आहेत.  माहामारीच्या सुरूवातीच्या दिवसात D strain व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. कोरोनाकाळात थंडीच्या वातावरणात कसे राहाल निरोगी? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या ८ टिप्स

मार्चपर्यंत D614G स्ट्रेन जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचला होता. एकूण संक्रमणाच्या एक चतृर्थांश रुग्णांच्या संक्रमणासाठी हा स्ट्रेन कारणीभूत होता.  मे महिन्यापर्यत D614G स्ट्रेन असलेल्या रुग्णांची संख्या ७० टक्के होती. आता जगभरात एकूण कोरोना रुग्णांपैकी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक रुगण  D614G स्ट्रेनमुळे संक्रमित झाल्याचे सांगितले जात आहे. ऑगस्टमध्ये सिंगापूर नॅशनल युविव्हर्सिटीचे सिनिअर कंसलटंट पॉल तांबयाह यांनी सांगितले की, ''D614G स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. पण मूळ व्हायरसच्या तुलनेत कमी जीवघेणा आहे.''  खुशखबर! जर्मन कंपनीच्या कोरोना लसीनं केली कमाल; मानवी चाचणीदरम्यान 'अशी' ठरली प्रभावी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य