शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

21 दिवसांच्या 'लॉकडाऊन'दरम्यान आपलं वजन 'अप' होऊ नये यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:37 IST

दोन-तीन आठवडे घरात बसून राहिल्यास वजन वाढण्याचा धोका आहे. हा धोका कसा टाळाल?

ठळक मुद्देपुढचे आणखी दोन-तीन आठवडे घरातच बसून राहायची वेळ आलेली असताना ‘हवं ते खात’ सुटू नका. शरीराला कोणताच व्यायाम नसल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते.

>> डॉ. स्नेहल अडसुळे 

कोरोना व्हायरसपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आणि घरातच क्वारंटाइन म्हणजे विलग होणे आवश्यक आहे. पण गेले तीन-चार दिवस घरात बसून आहात आणि आता पुढचे आणखी दोन-तीन आठवडे घरातच बसून राहायची वेळ आलेली असताना ‘हवं ते खात’ सुटू नका. कारण जेव्हा आपण अधिकाधिक वेळ घरातच बसून राहतो तेव्हा एकतर वारंवार भूक लागते आणि दुसरीकडे, शरीराला कोणताच व्यायाम नसल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनापासून तर दूर रहाल पण वजन वाढल्यामुळे दुसऱ्याच काही आजारांना निमंत्रण देऊन बसाल!

हे जर टाळायचं असेल, तर पुढचे काही दिवस पुढील काळजी आवर्जून घ्या. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन डॉ. स्नेहल अडसुळे ह्यांनी सांगितलेल्या टिप्स : 

आहारात प्रथिनांचा समावेश करा-जेव्हा वजन कमी करायचं असतं, तेव्हा न्यूट्रिएंट्समध्ये प्रोटिन्सला म्हणजे प्रथिनांना राजा मानलं जातं. तुमचं पोट भरताना पुरेशी प्रथिनं तुमच्या शरीरात जातील, ह्याची काळजी आवर्जून घ्या.

आरोग्यदायी स्नॅक्स खा-घरी बसून किंवा नेटफ्लिक्सवर वेबसीरीज बघून कंटाळा आला की, आपले हात आपोआप स्नॅक्सवर जातात. अरबट-चरबट स्नॅक्स चवीला चांगले लागले तरी शरीराला ते अपायकारकच. शिवाय, ते खाल्ल्यामुळे वजन वाढणार ह्याची ग्यॅरंटीच. म्हणून यॉगहर्ट, फळं, नट्स, गाजर, उकडलेली अंडी ह्यांचा तुमच्या स्नॅक्समध्ये समावेश करा.

साखरेवर लक्ष असू द्या-घरी आहात म्हणून उठ-सूठ चहा पिऊ नका. चहामधून तुमच्या शरीरात अतिरिक्त साखर जाऊ शकते. संपूर्ण दिवसभरात तुमच्या शरीरात दोन चमच्यांपेक्षा अधिक साखर जाणार नाही, ह्याची काळजी घ्या.

पाणी प्या-भरपूर पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हा दावा सत्य आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. अधूनमधून पाणी पित रहा. कोमट पाणी प्यायलात तर आणखी उत्तम.

लिक्विड कॅलरीज आणि व्हाइट रिफाइन्ड कार्ब्ज टाळा-सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस, चॉकलेट मिल्क, एनर्जी ड्रिंक्स ह्यांमधून शरीरात लिक्विड कॅलरीज जातात आणि व्हाइट ब्रेड, पास्ता, पेस्ट्री, मिठाई ह्यांमधून रिफाइन्ड कार्ब्ज. शक्यतो ह्यांचं सेवन टाळा.

ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या-कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली आपण सर्वजण जगत असताना मन शांत राहणं किंवा तसं ते जाणीवपूर्वक ठेवणं हे सोपं नाही, ह्याची मला कल्पना आहे. पण कोरोनाविषयी अधिक विचार करणं किंवा त्याविषयी चिंता करत बसणं, ह्यामुळे तुम्हाला कोणताही लाभ होणार नाहीए. हा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ का होईना, पण नियमित ध्यानधारणा करा. झोपही पुरेशी घ्या. 

व्यायाम करा-घरातच असलात तरी अॅक्टिव्ह रहा. सूर्यनमस्कार, योगासनं किंवा दोरीच्या उड्या हे व्यायाम तुम्ही घरात सहज करू शकता.

(डॉ. स्नेहल अडसुळे ह्या न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन असून 'वूमन मेटाबोलिझम डाएट' ह्यात विशेषज्ञ आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस