शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: जाणून घ्या, ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली की नाही, हे नेमके समजते कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 05:22 IST

जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये जिनोमच्या जीनमध्ये झालेले बदल दिसून येतात. जीन हे डीएनएपासून तयार झालेले असतात.

नवी दिल्ली -  सर्वांत भयावह वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची क्षमता असलेल्या ओमायक्रॉनचा शिरकाव भारतात झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्यांपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाला आहे. काही जणांचा शोध सुरू आहे. मात्र, त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची बाधा झाली की नाही, हे जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे केले जाते.

मात्र, हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. जाणून घेऊया... काय असते ही यंत्रणा, कशी काम करते आणि धीम्या गतीने चाचण्या होणे हे चिंताजनक कशामुळे? काय असते जिनोम सिक्वेन्सिंग? जाणून घेऊया... भारतात कमी होणाऱ्या चाचण्यामुळे चिंता वाढली

जिनोम सिक्वेन्सिंगमधून नवा विषाणू प्रकार कसा कळतो?जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये जिनोमच्या जीनमध्ये झालेले बदल दिसून येतात. जीन हे डीएनएपासून तयार झालेले असतात. जे शरीरात प्रोटीन तयार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या जीनमध्ये म्युटेशन झाले तर त्यातून नवा आजार किंवा नवा व्हेरिएंट याची माहिती मिळते. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनची माहितीही जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे मिळाली. विषाणूमध्ये स्पाइक प्रोटीन न मिळाल्याने हा नवा विषाणू असल्याचे समजले होते.

जिनोम सिक्वेन्सिंगचा फायदा काय? 

याद्वारे कोणत्याही विषाणूचा संपूर्ण बायोडाटाच काढता येतो. जिनोममध्ये झालेल्या बदलाची माहिती यातून मिळते.याच बदलामधून शास्त्रज्ञ एखाद्या विषाणूचा नवा प्रकार शोधून काढतात. जिनोम सिक्वेन्सिंगमुळे विषाणू तर कळतोच, शिवाय याचा फायदा उपचारासाठीही होतो. एचआयव्ही, सार्स विषाणू यांचीही जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येते.

किती वेळ, किती खर्च?४ हजार ते ८ हजार रुपये खर्च जिनोम सिक्वेन्सिंगसाठी येतो. या प्रक्रियेसाठी  २४ ते ९६ तासांचा कालावधी लागतो. भारतात त्याहूनही अधिक काळ लागतो आहे.

एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत किती केले जाते जिनोम सिक्वेन्सिंग?भारत ०.२ टक्केअमेरिका ३.६२ टक्केकॅनडा ९.०९ टक्केस्वीत्झर्लंड ९.०८ टक्केब्रिटन १२.८ टक्केनॉर्वे १३.०१ टक्केडेन्मार्क ४६.८ टक्केआयलँड ५६.२ टक्के

जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये कोणते राज्य आहे पुढे?केरळ महाराष्ट्र दिल्ली पश्चिम बंगाल तेलंगणा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन