खाजेवरचं 'आयव्हरमॅक्टिन' हे औषध कोरोनाचं संक्रमण नष्ट करण्यासाठी प्रभावी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:33 PM2020-08-10T16:33:25+5:302020-08-10T16:35:00+5:30

CoronaVirus News & Latest Updates : या औषधानं कोरोनापासून बचाव आणि  रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात असा दावा केला जात आहे.

Coronavirus : UP government directs use of scabies drug ivermectin to treat covid-19 | खाजेवरचं 'आयव्हरमॅक्टिन' हे औषध कोरोनाचं संक्रमण नष्ट करण्यासाठी प्रभावी, तज्ज्ञांचा दावा

खाजेवरचं 'आयव्हरमॅक्टिन' हे औषध कोरोनाचं संक्रमण नष्ट करण्यासाठी प्रभावी, तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील देशांमध्ये हाहाकार पसरला आहे. कोरोना विषाणूंच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. दरम्यान उत्तरप्रदेश सरकारने खाजेसाठी वापरात असलेल्या औषधानं कोरोना रुग्णांचे उपचार करण्यास परवागनी दिली आहे.

या औषधानं कोरोनापासून बचाव आणि  रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात असा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशच्याआरोग्य विभागाला कोरोना विषाणूंपासून रुग्णांना वाचवण्यासाठी हे औषध देण्याचे आदेश  दिले आहेत. या औषधाचे नाव आयव्हरमॅक्टिन आहे. या औषधाचा वापर  खाज येणे, त्वचेवर चट्टे येणं , पॅरासाईट्स इन्फेक्शन यासाठी केला  जातो.

या व्यतिरिक्त रिवर ब्लाइंडनेस, पोटातील जंतू मारण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयव्हरमॅक्टीन हे औषध कोरोना संक्रमण रोखण्यासाठी परिणामकारक ठरत आहेत. तसंच  हे औषध व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखते. त्यामुळे व्हायरस संक्रमित रुग्णांच्या डीएनएशी मिळून आपली संख्या वाढवू शकत नाही. 

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती झाल्यानंतर सुरूवातीचे तीन दिवस रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी आयव्हरमॅक्टीन गोळी दिली जाणारआहे. त्यासोबतच डाक्सीसाइक्लीन हे औषधही पाच दिवसांपर्यंत रोज दोनवेळा दिलं जाणार आहे. 
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना हे औषध देण्यात येणार आहे.

संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण होण्यापासून बचावासाठी पहिल्या आणि सातव्या दिवशी  जेवणानंतर दोन तासांनी हे औषधं दिलं जाणार आहे. पहिल्या सातव्या आणि तिसाव्या दिवशी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना हे औषध  दिलं जाणार आहे. त्यानंतरच्या महिन्यातही हा क्रम सुरू ठेवण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाच्या बायोमेडिसिन डिस्कवरी इंस्टिट्यूटचे डॉं. कायली वागस्टाफ यांनी एप्रिलमध्ये केलेल्या दाव्यानुसार आयव्हरमॅक्टीन या औषधाने फक्त ४८ तासात कोरोना विषाणूंना नष्ट करता येऊ शकतं. फक्त २४ तासात हे औषध आपला परिणाम दाखवायला सुरूवात करतं. ऑस्ट्रेलियाच्या एंटीव्हायरल रिसर्च जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. 

हे पण वाचा :

२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

Web Title: Coronavirus : UP government directs use of scabies drug ivermectin to treat covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.