CoronaVirus : Covid 19 new symptoms of coronavirus can cause diarrhea and vomiting | कोरोनाच्या नवीन ३ लक्षणांमुळे वाढतोय धोका; तुम्हालाही जाणवत असतील तर हलक्यात घेणं पडेल महागात

कोरोनाच्या नवीन ३ लक्षणांमुळे वाढतोय धोका; तुम्हालाही जाणवत असतील तर हलक्यात घेणं पडेल महागात

(image credit- Healthline, Healthsite)

कोरोना व्हायरने जगभरात थैमान घातलं आहे.  कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. या आजारापासून बचावासाठी जगभरातील देशांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या माहामारीवर कोणताही लस किंवा औषध अजूनही उपलब्ध झालेली नाही. कोरोनाच्या संक्रमणामुळे जगभरातील लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसचे रुग्ण जगभरातील अनेक देशात झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचे नवीन रुप समोर यायला सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसची नवीन लक्षणं तुम्हाला जाणवत असल्यास साध्या समस्या म्हणून दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं.   

उलट्या

कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये उलट्या होणं या लक्षणाचा समावेश आहे. उलट्यांनी त्रस्त असलेले रुग्ण तपासणीसाठी गेल्यास त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. अशा स्थितीत लोकांना संक्रमणपासून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी या लक्षणाचा समावेश कोरोनाच्या लक्षणांमध्ये करण्याचे सांगितले आहे.

डायरिया

अतिसार किंवा डायरिया हे सुद्धा कोरोनाचं मुख्य लक्षणं आहे. डायरियाची समस्या उद्भवत असलेले लोक कोरोना पॉजिटिव्ह असू शकतात. अशा रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दिसून येतात. तुम्हालाही दोन दिवसांपेक्षा हा त्रास होत असेल तसंच ताप, सर्दी, खोकला असेल तर त्वरित तपासणी करून घ्या.

मळमळणं 

कोरोनाची लागण झालेल्या अनेकांना मळमळ होण्याची समस्या उद्भवत आहे.  कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण हे लक्षणं दिसत नसलेले असल्यामुळे या साध्या लक्षणांवरून कोविड 19  झालाय की नाही हे ओळखणं कठीण आहे. याशिवाय अंगदुखीची समस्याही लोकांना उद्भवत आहे. 

सध्या कोरोना व्हायरसच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी,  घसा खवखवणं शिंका येणं या समस्यांचा समावेश आहे. सध्या बदलत्या वातावरण वर नमुद केलेली तीन लक्षणं सर्वाधिक दिसून येतात. तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर त्वरीत तपासणी केल्यास आजारापासून बचाव होण्यास मदत होईल. 

कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आत्तापर्यंत गंभीर आजारात वापरात असेलेल्या औषधांचा वापर केला जात होता. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर लस आणि औषध  शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर भारतातील फार्मा बायोटेक, अमेरिकेतील मॉडर्ना आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस अंतीम टप्प्यात आहे.

खुशखबर! कोरोना विषाणूंना नष्ट करणार 'कोरोनाविर'; 'या' औषधानं रोखता येईल विषाणूंची वाढ

CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : Covid 19 new symptoms of coronavirus can cause diarrhea and vomiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.