शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

दिलासादायक! जीवघेण्या कोरोना व्हायरसला असा रोखतोय 'कॉमन कोल्ड कोरोना', तज्ज्ञांचा दावा

By manali.bagul | Updated: October 8, 2020 11:57 IST

CoronaVirus News & Latest Upadtes : जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टीगेशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरूवातीपासूनच डायबिटीस, उच्च रक्तदाब, दमा आणि श्वसनासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त असतो तसंच मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत एक सकारात्मक बाब समोर आली आहे. ज्या लोकांना आधी एका सामान्य सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाव्हायरसची लागण झाली असेल, त्यांना कोरोना होतो मात्र तो गंभीर रूप घेत नाही. म्हणजेच रुग्ण गंभीर स्थितीत जात नाहीत. असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं आहे.

जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टीगेशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोना हा नवीन व्हायरस असून असे अनेक व्हायरस आहेत. कॉमन कोल्ड आणि न्यूमोनिया त्यापैकीच एक आहेत. कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस Covid-19 साठी कारणीभूत ठरणाऱ्या SARS-CoV-2 ची तीव्रता कमी करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे एका संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले असून यात भारतीय शास्त्रज्ञांचाही सहभाग होता. ज्या रुग्णांना कॉमन कोल्ड  झाला होता अशा रुग्णांना  कोरोना झाल्यानंतर ICU, व्हेंटीलेटरची गरज पडली नाही. तसंच अशा रुग्णांमध्ये मृत्यूदरात प्रमाणही कमी आहे, असं संशोधकांना दिसून आलं.

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील तज्ज्ञ मनीष सागर यांनी  दिलेल्या माहितीनुसार ज्यांना कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरसचं इन्फेक्शन झालं होतं, त्या लोकांमध्ये  कोविड-19 ची गंभीर लक्षणं  कमी प्रमाणात दिसून आली होती. कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस SARS-CoV-2 सह काही जेनेटिक सिक्वेन्स तयार करते. परिणामी या तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाशी लढण्यासाठी परिमाकारक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.  ज्यांना आधी  non-SARS-CoV-2  कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल त्यांना आता कोरोनापासून बचाव करणं सोपं होऊ शकतं. कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी हे संशोधन महत्वपूर्ण ठरेल असा दावा संशोधकांनी केला आहे. 

कोरोना संक्रमणानंतर उद्भवू शकते 'लॉन्ग कोविड' ची समस्या

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनानंतर लॉन्ग कोविड समस्या ('Long Covid') निर्माण होऊ शकते.  कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा त्या स्थितीला लॉन्ग कोविड म्हणतात. कोरोना संक्रमण पूर्णपणे कमी झाल्यानंतर या समस्या दीर्घकाळ शरीराला उद्भवू शकतात. कारण कोरोनातून जीव वाचलेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे आजारपणही मोठ्या प्रमाणावर लोकांना उद्भवते. त्यामुळे अनेक लोकांना रोजची कामं करण्यासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

ब्रिटनच्या प्रसिद्ध तज्ज्ञांचा गट स्पेक्टर यांनी सांगितले होते की, कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम झाला आहे. श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं तसंच शरीरातील इतर भागांवरही परिणाम होत आहे. अनेक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहण्याची शक्यता आहे. किंग्स कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी सांगितले  होते की, कोरोना संक्रमित असलेल्या १० पैकी एका व्यक्तीला लॉन्ग कोविडची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांनी जवळपास ४० लाख लोकांच्या माहितीचे विश्लेषण यासाठी केले होते. दर ५० पैकी एका व्यक्तीला ३ महिन्यानंतरसुद्धा 'Long Covid' चा सामना करावा लागत होता. दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाHealth Tipsहेल्थ टिप्स