सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:46 PM2021-03-09T17:46:19+5:302021-03-09T17:53:38+5:30

CoronaVaccine News & Latest Updates : जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीद्वारे रक्तात काही रासायनिक प्रवाह होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होते. अनेकदा त्वचेवर चट्टे येणं किंवा अन्य समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. या स्थितीला अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन्स असं म्हणतात.

CoronaVaccine News : Covid vaccine women face worse side effects cdc study says | सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा

सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा

Next

कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांना गंभीर साईड इफेक्ट्सचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या एका नवीन अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीनं एक कोटी ३७ लाख  लसीकरण डेटाचा अभ्यास केला आहे. यादरम्यान दिसून आलं की, साईड इफेक्ट्सच्या  एकूण घटनांमध्ये ७९ टक्के महिलांनी माहिती दिली होती. यातील एकूण ६१ टक्के महिलांना लस टोचण्यात आली होती. 

दरम्यान कोणतीही लस घेतल्यानंतर महिला आणि पुरूषांमध्ये वेगवेगळे साईड इफेक्ट्स दिसून येणं यात नवीन असं काहीही नाही.  कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवरील लस घेतल्यानंतरही महिला आणि पुरूषांवर वेगवेगळा परिणाम झालेला पाहायला मिळतो. यामागे हार्मोन्स, जीन्स यांसारखे अन्य  घटकही कारणीभूत आहेत. अमेरिकेतील सीडीसीच्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतल्यानंतर कमी प्रमाणात Anaphylactic Reactions रिएक्शन्स दिसून येतात. यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीद्वारे रक्तात काही रासायनिक प्रवाह होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होते. अनेकदा त्वचेवर चट्टे येणं किंवा अन्य समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. या स्थितीला अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन्स असं म्हणतात. या अभ्यासादरम्यान मॉर्डना लसीचे  Anaphylactic Reactions चे एकूण १९ प्रकरणं समोर आली आहेत. असा प्रकार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. याशिवाय फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर ४७ प्रकरणं  समोर आली आहेत. त्यापैकी ४४ घटना महिलांसह घडल्या आहेत.

याआधीही  २०१३ मध्ये सीसीडीच्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार २००९ मध्ये फ्लूच्या माहाामारीत  लस घेतल्यानंतर महिलांना एलर्जी होण्याचं प्रमाण वाढलं होतं. आणखी एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार १९९० ते २०१६ दरम्यान Anaphylactic Reactions या प्रकरात महिलांच्या संख्येत ८० टक्क्यांनी वाढ झाली.

लस घेतल्यानंतर काही महिन्यातच महिलांच्या छातीत विकसित झाल्या सुजेच्या गाठी

यादरम्यान काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी एक हैराण करणारा खुलासा केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतल्यानंतर काही महिन्यांनी महिलांना स्तनांमध्ये सुजेच्या गाठी विकसित होण्याचे प्रकार समोर आले आहेत. ही घाबरण्यासारखी गोष्ट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.  अमेरिकेतील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या गाठी शरीरातील लिम्फ नोड्समध्ये तयार होत आहे. लिम्फ नोड एक वाहिन्यांचे एक नेटवर्क आहे.

अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित

त्यामळे किटाणूंची छाननी केली जाते.  गाठ छातीच्या अशा भागात तयार होत आहे. ज्या बाजूच्या हातावर महिलांनी लस घेतली आहे. मॅमोग्राममध्ये अनेक महिलांमध्ये लसीकरणानंतर या गाठीचा त्रास असल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची अनावश्यक भिती वाढत आहे.  मेमोग्राम एक छातीच्या एक्स-रे चं परिक्षण आहे. डॉक्टर ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी करण्यासाठी मेमोग्रामचा वापर करतात. म्हणून याला मेमोग्राफी असंही म्हणतात. 

सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

या परिणामांच्या आधारे अमेरिकेतील डॉक्टरांनी महिलांना आवाहन केलं आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर चार आठवड्यांपर्यंत मॅमोग्रामसाठी जाऊ नका. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार तज्ज्ञ म्हणतात की, लिम्फ नोड्समध्ये सुज येणं हे अन्य लसी घेतल्यानंतरही (टीबीसाठी बीसीजीची लस, फ्लूची लस) दिसून येऊ शकतं. 
 

Web Title: CoronaVaccine News : Covid vaccine women face worse side effects cdc study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.