Corona virus scientists predict that covid-19 will become a seasonal virus | हर्ड इम्युनिटी किंवा लस विकसित न झाल्यास कोरोना ठरू शकतो साथीचा आजार; तज्ज्ञांचा दावा

हर्ड इम्युनिटी किंवा लस विकसित न झाल्यास कोरोना ठरू शकतो साथीचा आजार; तज्ज्ञांचा दावा

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरसचा सामना संपूर्ण जगभरातील देशांना करावा लागत आहे. या माहामारीपासून सुटका मिळवण्यासाठी दिवसरात्र लस तयार करण्याचे काम सुरू आहे. कोरोना व्हायरसबाबत वैज्ञानिकांना आता नवीन संशोधन केले आहे.  हे संशोधन 'जर्नल फ्रंटीअर इन पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात हर्ड इम्यूनिटी विकसित न झाल्यास कोरोना हा आजार वातावरणातील बदलांमुळे उद्भवणारा साथीचा आजार ठरू शकतो.

रिपोर्टमधील माहितीनुसार बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार पसरण्याची भीती असते. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरससुद्धा सर्दी, खोकला पसरत असलेल्या व्हायरसप्रमाणे आपलं स्वरुप बदलू शकतो. जोपर्यंत हर्ड इम्युनिटी विकसीत होत नाही किंवा लस येत नाही तोपर्यंत कोरोना व्हायरस वातावरणतील बदलांमुळे पसरत असलेल्या आजारांप्रमाणे पसरण्याची शक्यता आहे.

कब तक शिकार होंगे लोग?

लेबनानच्या अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बेरूतचे संशोधक हसन जराकत यांनी कोरोना व्हायरसबाबत लोकांना सुचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, ''जोपर्यंत हर्ड इम्यूनिटी विकसीत होत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रसार असाच सुरू राहील. आपण कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. संसर्गापासून वाचण्यासाठी नेहमी मास्कचा वापर  करायला हवा. सतत हात धुणं, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणं यामुळे  कोरोपासून बचाव करता येऊ शकतो.

अनेक तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, हर्ड इम्यूनिटी विकसित होईपर्यंत कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात.'' तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हवा किंवा इतर परिसरात व्हायरस जीवंत राहू शकतो. लोकांची बदलत जाणारी शारीरिक क्षमता आणि तापमान, आद्रता यांचा व्हायरसवर परिणाम होतो. याच कारणामुळे रेस्पिरेटरी व्हायरसच्या संक्रमणाचा धोका वाढतो.

कोणत्याही लसीशिवाय ३ देशांनी कोरोनावर 'अशी' केली मात

संपूर्ण जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कच्या वापरावर जोर दिला जात आहे. जपान, कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशात मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मागील काही दिवसात छापण्यात आलेल्या माहितीनुसार कापडापासून तयार केलेला मास्क सावधगिरीनं वापरल्यास लसीप्रमाणेच  प्रभावी ठरू शकतो. हे एक आंतरराष्ट्रीय नियतकालीक आहे.

जेव्हा मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर केला जातो तेव्हा संक्रमित व्यक्तींच्या शरीरातून कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट्स खूप कमी प्रमाणात वातावरणात एकत्र होतात. जेव्हा कमी प्रमाणात ड्रॉपलेट्स वातावरणात एकत्र होतात आणि आजूबाजूच्या लोकांनी मास्क लावलेला असतो. तेव्हा शरीरात कमी प्रमाणात व्हायरसचं संक्रमण पसरतं. यामुळे गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्यापासून वाचता येऊ शकतं. 

अशा स्थितीत जेव्हा कोणच्याही व्यक्तीच्या शरीरात नवीन व्हायरसचा प्रवेश होतो. तेव्हा शरीरात व्हायरसचा लोड कमी असतो. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसला ओळखून लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी आणि व्हायरसला नष्ट करण्यासाठी पूर्ण वेळ घेते. म्हणून न लसी तयार होत नाही तोपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी मास्कचा वापर प्रभावी ठरू शकतो. 

हे पण वाचा-

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus scientists predict that covid-19 will become a seasonal virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.