Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 11:27 AM2021-06-08T11:27:10+5:302021-06-08T11:27:50+5:30

Corona Vaccination: देशातील लसीकरणात सर्वाधिक वापर सीरमच्या कोविशील्ड लसीचा होतोय

Corona Vaccination Why Single Dose Of Covishield Vaccine May Not Be Such A Bad Idea | Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

Next

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या घरात आला आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला गती दिली जात आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतरदेखील वाढवण्यात आलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लसींची टंचाई कायम आहे.

सर्वात मोठा दिलासा! ...तर तुमच्या मुलांना कोरोनाचा कमी धोका; तुम्ही फक्त 'एवढंच' करा

देशात लसींचा तुटवडा जाणवत असताना पुन्हा एकदा लसीच्या सिंगल डोसची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीचा केवळ एक डोस प्रभावी ठरू शकतो, असं ब्रिटनचे व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख केट बिंगम यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं. यानंतर या वर्षी जानेवारीत जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल स्टॉफल्स यांनीदेखील आपल्या लसीचा एकच डोस कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी पुरेसा असल्याचं म्हटलं होतं.

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

कोविशील्डचा एकच डोस देण्याची चर्चा काही दिवसांपूर्वी भारतातही सुरू होती. त्यावेळी ट्विटरवर एकच गोंधळ उडाला. दुसऱ्या दिवशी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्टीकरण दिलं. 'कोविशील्ड लसीच्या वेळापत्रकात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. यापुढेही कोविशील्डचे दोन डोस दिले जातील,' असं पॉल यांनी सांगितलं. कोविशील्ड लसींची चाचणी ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुपचे संचालक अँड्र्यू पोलार्ड यांच्या देखरेखीखाली झाली. कोविशील्डचा एकच डोस घेतल्यास काय होईल, याची माहिती त्यांनी दिली.

'सुरुवातीला आम्ही कोरोनावर एकच डोस असलेली लस तयार करत होतो. लवकरात लवकर लसीकरण करून जास्तीत जास्त जणांचे प्राण वाचवण्यास आमचं प्राधान्य होतं. मात्र ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानं आम्हाला उपलब्ध माहितीवर काम करण्यास वेळ मिळाला. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये तयार होणारी प्रतिकारशक्ती एक डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त असल्याचं अभ्यासातून समोर आलं,' अशी माहिती पोलार्ड यांनी दिली.

'कोविशील्डचा एक डोसदेखील प्रभावी असल्याचं वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलं आहे. याबद्दलची आकडेवारी उपलब्ध आहे. कोविशील्डचा एकच डोस घेतल्यानंतरही उच्चस्तरीय सुरक्षा मिळते. एक डोस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तरी त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. ती व्यक्ती घरीच कोरोनामुक्त होऊ शकते,' असं पोलार्ड यांनी सांगितलं.

Web Title: Corona Vaccination Why Single Dose Of Covishield Vaccine May Not Be Such A Bad Idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.