शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: कोरोना रुग्णापासून संसर्ग होण्याची शक्यता कोणत्या ठिकाणी किती?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:03 IST

संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीसोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची वेळ आणि व्यक्तीपासून अंतर, हे संसर्गाची शक्यता ठरवणारे महत्त्वाचे घटक आहेत.

- अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीसोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची वेळ आणि व्यक्तीपासून अंतर, हे संसर्गाची शक्यता ठरवणारे महत्त्वाचे घटक आहेत. याविषयी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे भूतपूर्व प्रती कुलगुरू व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शेखर राजदेरकर सांगतात की, जर कोरोना रुग्णाशी मास्क न घालता तुमचा अर्धा तास बोलण्यासारख्या स्वरूपात जवळचा संपर्क आला तर संसर्ग होईल; पण ही संपर्काची वेळ २५ मिनिटे झाली तर संसर्गाची शक्यता ९०% इतकी कमी होईल. जर हीच संपर्काची वेळ १५ मिनिटे इतकी कमी झाली तर मात्र संसर्ग झाला तरी तो लक्षणविरहित किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असलेला असेल. जर संपर्काचा हाच कालावधी गृहीत धरून यात नाक व तोंड पूर्ण झाकणारा मास्क, ६ फुटांपेक्षा जास्त शारीरिक अंतर आणि संपर्कानंतर हात धुणे या प्रतिबंधक उपायांची भर पडली तर संसर्गाची शक्यता खूपच कमी होते. म्हणजेच कोरोना संसर्गित रुग्णाचा १५ मिनिटांपेक्षा कमी संपर्क आणि हे प्रतिबंधक उपाय कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकते. कमी संपर्काच्या वेळेने झालेल्या संसर्गातून रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी असेल.वेळेसोबतच पुढील काही गोष्टी संसर्गाची शक्यता ठरवतील :बंद जागेत / खुल्या जागेतछोट्या जागा / मोठी जागाकमी जागेत जास्त लोक / कमी लोकवरील गोष्टी गृहीत धरल्यास पुढील गोष्टींमध्ये संसर्गाची शक्यता जास्त की कमी हे सांगता येईल.कोरोनाबाधित व्यक्तीशी मास्क वापरून व ६ फूटपेक्षा जास्त अंतर राखून समोरासमोर बोलल्यास- संपर्क वेळ ५ मिनिटांपेक्षा कमी असल्यास : संसर्गाची शक्यता खूप कमीचालताना / जॉगिंग / सायकलिंग करताना दोघांनीही मास्क घातला असल्यास : संसर्गाची शक्यता नाहीहवेशीर व मोकळ्या जागेत संपर्क आल्यास व ६ फूट अंतर राखल्यास : संसर्गाची शक्यता कमीकिराणा दुकान व इतर दुकाने शक्यता-छोट्या जागेत जास्त लोक : संसर्गाची शक्यता जास्तसार्वजनिक शौचालय / बाथरूम : संसर्गाची शक्यता जास्तकमाच्या बंदिस्त जागा / शाळा : संसर्गाची शक्यता जास्तलग्नसमारंभ / इतर अनेक लोक जमतील असे सार्वजनिक समारंभ : संसर्गाची शक्यता जास्तधार्मिक स्थळे : संसर्गाची शक्यता जास्तसिनेमागृहे / नाट्यगृहे / शॉपिंग मॉल : संसर्गाची शक्यता जास्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या