डोळ्यांसंबंधी 'या' समस्यांचा उन्हाळ्यात वाढतो धोका, वाचा आणि काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:59 AM2024-05-14T10:59:20+5:302024-05-14T11:02:18+5:30

आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात होणाऱ्या डोळ्यांसंबंधी 4 समस्या आणि त्यापासून बचावाचे उपाय....

Common Eye Diseases You Can Get In The Summer | डोळ्यांसंबंधी 'या' समस्यांचा उन्हाळ्यात वाढतो धोका, वाचा आणि काळजी घ्या!

डोळ्यांसंबंधी 'या' समस्यांचा उन्हाळ्यात वाढतो धोका, वाचा आणि काळजी घ्या!

Eye problems in summer: उष्णता वाढली की, केवळ आपल्या शरीरावरच नाही तर डोळ्यांवरही याचा प्रभाव पडतो. उन्हात जास्त वेळ राहणं, घाम येणं, धूळ-माती उडणं आणि झोप कमी येणं यासारख्या कारणांमुळे डोळे कोरडे पडणं कॉमन आहे. यामुळे डोळ्यात जळजळ, खाज, लालपणा आणि धुसर दिसण्यासारख्या समस्या होतात. अशात आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात होणाऱ्या डोळ्यांसंबंधी 4 समस्या आणि त्यापासून बचावाचे उपाय....

1) डोळ्यांमध्ये जळजळ

उन्हाळ्यात सूर्यकिरणांमधून निघणारे अल्ट्रावायलेट किरणं डोळ्यांसाठी नुकसानकारक असतात. तेच जास्त कोरडं वातावरण असल्याने धूळ-माती उडत राहते जी तुमच्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकते.

2) डोळ्यांमध्ये खाज

उन्हाळ्यात स्वीमिंग पूल, तलाव आणि नद्यांमध्ये आंघोळ केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. डोळ्यांमध्ये खाजही एखाद्या इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. तेच अनेकदा धूळ मातीमुळेही डोळ्यांमध्ये खाज येते. अशात उन्हात बाहेर जाताना नेहमी सनग्लासेसचा वापर करा. उन्हात जास्त वेळ थांबू नका. नियमितपणे डोळ्यांची टेस्ट करा.

3) डोळे लाल होणे

उन्हाळ्यात धूळ, माती आणि परागकणांपासून एलर्जी होणं कॉमन आहे. याने डोळ्यांमध्ये खाज, लालपणा, पाणी येणे आणि सूज यांसारख्या समस्या होऊ शकतात. हे डोळ्यांच्या एखाद्या एलर्जीचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

4) डोळ्यांमध्ये वेदना

उन्हाळ्यात अनेकदा उष्णता किंवा धूळ-मातीमुळे डोळ्यांमध्ये वेदना होऊ लागतात. पण तुम्हाला जर डोळे लाल होण्यासोबतच वेदनाही होत असेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच डोळे अस्वच्छ हातांनी चोळू नका. उन्हात जास्त वेळ थांबू नका. 

या गोष्टींचीही घ्या काळजी

- स्वीमिंग पूल, तलाव आणि नद्यांमध्ये आंघोळ करताना डोळ्यांची काळजी घ्या.

- सतत हातांनी डोळे चोळू नका.

- अस्वच्छ पाण्याने डोळे धुवू नये.

- पुरेशी झोप घ्या.

- पौष्टिक आहार घ्या.

- नियमितपणे व्यायाम करा.

- तणाव कमी करा.

Web Title: Common Eye Diseases You Can Get In The Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.