शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावं; सांगताहेत प्रसिद्ध शेफ 'पद्मश्री' संजीव कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 2:17 PM

मनुष्यात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सगळ्यात जास्त आहाराचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास काही अतिशयोक्ती होणार नाही.

(- सीताराम मेवाती)

कोरोना काळात काय खाणे किंवा काय न खाणे या विषयावर खूप वादविवाद होत आहे. काही जण या विषयाचं शुन्य ज्ञान असून सुद्धा काही न काही प्रयोग करण्यास सांगुन दिशाभूल करतात. असे काही प्रयोग करून फायदा न होता नुकसानच जास्त होतो. भारतीय जेवण पद्धती अगदी प्राचीन असून त्यात वेगवेगळ्या हवामानात किंवा काही प्रकारचे आजारपण आल्यास खास प्रकारचे जेवण जेवण्याची पद्धत आहे, ती नेहमी उपयोगी पडते.  

मनुष्यात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सगळ्यात जास्त आहाराचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास काही अतिशयोक्ती होणार नाही. चांगले आहार किंवा पदार्थ खाऊन आपली प्रतिकारशक्ती नेहमी हमखास वाढत असते.  या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अगदी गरजेचे व महत्वपूर्ण आहे. हल्ली आपल्या देशात जणू काही परदेशी सुपर फूड खाण्याची स्पर्धा सुरु आहे जेणेकरून आपले देशी आहार अगदी मागच्या रांगेत पोहोचले आहे. 

इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजुन घेतली पाहिजे की भारतीय पदार्थ प्राचीन काळापासून आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध आहे. आपले देशी आहार अगदी तंतोतंत मानक वर खरे उतरले आहेत जेणेकरून काही आजारावर मुळापासून काढून टाकण्यात यशश्वी ठरले आहे. जरी काही घरात देशी आहाराने मागील टप्पा गाठला असला तरीसुद्धा आजही अधिकाधिक घरात अक्षरशः आज पण देशी आहार अग्रणी आहे. जे कोण पण त्यांचा वापर करत आहे ते अगदी खुश आणि प्रकृतीने उत्तम आहेत.

आहारात काय महत्वाचं?

कोरोना महामारीच्या काळात आपल्या आहारात रोग प्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ समाविष्ट करणे अगदी गरजेचे आहे. चांगले पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती हमखास वाढते. हे पदार्थ म्हणजे ताजे भाजीपाले, हिरवी पाले भाजी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असे आहेत. चपाती किंवा भाखरी करण्यास प्राचीन काळापासून वापरण्यात येणारे म्हणजेच ज्वारी, बाजरी आणि राजगीराचा समावेश आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास आंबट फळ  खाणे पण अगदी गरजेचे आहेत. आंबट फळ म्हणजे संत्री, मोसंबी आणि लिंबू इत्यादी.  ही फळे आपल्या शरीरावर जादू सारखे काम करतात. रोगप्रतिकारक शक्तीचा एक चांगला मित्र म्हणजे आवळा, खूपच आंबट असल्याने लोक आवळे खाणे कमी पसंत करतात. आवळा म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचा एक रामबाण उपाय आहे. आवळ्याचा वापर आपण आपल्याला आवडत असलेल्या कुठल्याही पद्धतीने व आपल्या इच्छेप्रमाणे करू शकतो. आपण आवळ्याचा प्रयोग आवळा रस, आवळा लोणचे किंवा आवळा मुरब्बाच्या स्वरूपात करू शकतो.

अधिक फायदेशीर मसाले

आपल्या देशात अनेक प्रकारचे मसाले आहेत ज्यांचा आपण रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यास सर्रास वापर करू शकतो. या मसाल्यात हळद, दालचिनी, हिरवी किंवा काळी वेलची, काळीमिरी, दालचिनी, लवंग, सुंठ किंवा ताजे आले असे आहे. हे सगळे मसाले आपण काढा बनविण्यास वापरू शकतो, हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चमत्कारिक काम करतात. जर आठवत असल्यास, आपली आजी सुरुवाती पासून पारंपारिकपणे घरगुती वस्तु वापरून आपल्याला नेहमी स्वस्थ ठेवत आल्या.

एक गोष्ट लक्षात असू द्या, जेव्हा शाकाहारी जेवणाचा संदर्भ येतो तेव्हा तेथे अमर्यादित रोगप्रतिकारक शक्ती असते व ते खूप गुणकारी असतात. तुम्ही जर माझा वैयक्तिक सल्ला विचारल्यास मी मांसाहारी पदार्थ खाण्यास कधीही सूचना करणार नाही. सद्य परिस्थिति लक्षात घेता, आपण शाकाहारी पदार्थ खाण्यावर अधिक भर देणे अशी माझी वैयक्तिक सूचना.

आहारासोबत आणखी काय गरजेचं?

आहाराच्या सोबत आपल्याला व्यायाम करणे अगदी महत्वाचे आहे. आपल्याला दार रोज काही व्यायाम करणे गर्जेचे आहे. आपण मॉर्निंग वाक, सायकल चालविणे, प्राणायाम व योग केल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती निश्चितच वाढते. आपण एक नियम केले पाहिजे कि आपल्याला चांगले आहार व व्यायाम करून आपण आजारपण दूर ठेवू शकतो. हे सगळे करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि सरकारने दिलेल्या सूचना जसे मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिन्ग करणे अगदी आवश्यक आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स