शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

चिंताजनक : स्वस्त इंटरनेट पॅकमुळे वाढत आहे तरुणांमधील मानसिक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:08 AM

स्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

नवी दिल्ली - टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे गेल्या काही काळापासून इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मात्र या स्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, इंटरनेटचा अतिरेकी वापर लोकांना मानसिक रोगी बनवत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे तरुणांच्या मेंदूवर परिणाम  होत आहे. त्यामुळे चिडचिडेपणा, राग, अस्वस्थता, एकटेपणा आणि विचारांवर नियंत्रण न राहणे असा समस्यांनी तरुणाईला ग्रासले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचे प्रमाणही चिंताजनक आहे. १६ वर्षांपर्यंतच्या मुलांलैकी १३ टक्के मुले मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याचे लखनौमधील केजीएमयू रुग्णालयातील मानसिक रुग्ण विभागातील डॉक्टर विवेक अग्रवाल यांनी सांगितले.  शिक्षण आणि कामाचा दबाव, लैंगिक आणि शारीरिक शोषण, नशा आणि पारिवारिक समस्यांमुळे तरुणांमधील आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. जीवनात यशस्वी होण्याचा दबाव तरुणांना मानसिकदृष्ट्या त्रस्त करत आहे. त्यामुळे प्रकरण आत्महत्येपर्यंत पोहोचत आहे.  दरम्यान, देशातील दर चारजणांपैकी एक जण मानसिक दृष्ट्या आजारी  आहे. अशा लोकांना उपचारांची गरज आहे. मात्र या रुग्णांपैकी ९० टक्के जण स्वत:ला आजारा मानतच नाही. हळुहळू त्यांची समस्या गंभीर होते आणि त्यांच्यावर इलाज करणे दुरापास्त होते,  असे डॉ. भूपेंद्र यांनी सांगितले.  मानसिक आजार सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर त्यावर औषधाशिवाय इलाज होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात समुपदेशनातून हा आजार दूर होऊ शकतो, असे डॉक्टर सांगता.  व्हर्चुअल जगापासून दूर राहणे हा या मानसिक आजारांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत अधिकाधिक वेळ घालवावा, असा सल्ला डॉक्टर देतात. 

टॅग्स :InternetइंटरनेटMobileमोबाइलHealth Tipsहेल्थ टिप्स