'एमएस धोनी' द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातील आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कियारा आडवाणीला खरी ओळख कबीर सिंह या चित्रपटामुळे मिळाली असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. या चित्रपटात कियाराने अभिनेता शाहिद कपूरसोबत स्क्रिन शेअर केली असून हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कियाराचा फ्रेश लूक आणि परफेक्ट फिगर मुलींसाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच आहे. 

अनेक मुलीं कियाराप्रमाणे फिटनेस मिळवण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. पण कियाराच्या या सौंदर्याचं गुपित म्हणजे, तिची मेहनत आणि स्ट्रिक्ट डाएट आहे. अशातच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकं कोणत्या प्रकारच्या डाएट आणि एक्सरसाइजचा वापर करून ती स्वतःला फिट अन् फाइन ठेवते? कियाराचा बॅलेन्स डाएट आणि एक्सरसाइज रूटीन नक्की आहे तरी काय, यासाठी जाणून घेऊया तिचा फिटनेस फंडा... 

पुल-अप्स आणि फंक्शनल ट्रेनिंग

कियारा पुल अप्ससोबत फंक्शनल ट्रेनिंग फार एन्जॉय करते. टाइम्स नाऊ या बेवसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, कियाराचं असं म्हणणं आहे की, ज्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या आवडीने करता त्याचा तुमच्या शरीराला जास्त फायदा होत असतो. याव्यतिरिक्त ती स्क्वाड्स, पुशअप, स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंग आणि एरोबिक्सच्या मदतीने ती आपलं वजन नियंत्रणात ठेवते. याबाबत बोलताना कियारा सांगते की, तिला एक्सरसाइज करायला फार आवडतं. याशिवाय ती जिम करण्याव्यतिरिक्त नेचर रनिंग फार एन्जॉय करते. तसेच तिला डान्स करायलाही फार आवडतं. 

फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश 

कियाराचं असं म्हणणं आहे की, फळांच्या ज्यूसऐवजी फळं खाणं नेहमी फायदेशीर ठरतं. याशिवाय आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणंही अत्यंत फायदेशीर ठरतं. जास्त तेलकट पदार्थ किंवा जंक फूड खाणं जेवढं शक्य असेल तेवढं टाळावं. एवढचं नाही तर कियारा दिवसभरामध्ये फक्त दोन चमचे साखर खाते. तिच्या डाएटमध्ये 55 टक्के प्रोटीन असतं. इतर डाएटमध्ये ती कार्बोहायड्रेट, फॅट्ल इत्यादी गोष्टी बॅलेन्स करते. कियारानुसार, फेस मसाज घेणंही अत्यंत फायदेशीर ठरतं. पण मसाज करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करणं उत्तम ठरतं. व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थांनी मसाज करणं चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.

कोमट पाणी पिते कियारा 

कियारा सकाळी उठल्यावर लिंबाचा रस एकत्र करून कोमट पाण्याचं सेवन करते. तिचं असं म्हणणं आहे की, लिंबाचा रस शरीराची मेटाबॉल्जिम सिस्टम उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. याव्यतिरिक्त फ्रुट्समध्ये स्ट्रॉबेरी, संत्री आणि सफरचंद इत्यादी फळांचा नाश्त्यामध्ये समावेश करते. यानंतर ती जिममध्ये वर्कआउट करते. वर्कआउटनंतर ती नट्स, ओट्स आणि मुसली यांचं सेवन करते. दही, दूध आणि अंडी तिच्या नाश्त्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं. दुपारच्या जेवणामध्ये कियारा मल्टीग्रेन पिठाच्या चपाती आणि मोड आलेल्या डाळींचा समावेश करते. याव्यतिरिक्त भेंडीची भाजी, भोपळा यांसारख्या भाज्यांचाही समावेश करते. एवढचं नाहीतर रात्रीचं जेवण ती संद्याकाळी सात वाजता करते. यामध्ये ती सी फूडचा समावेश करते. रात्री चपाती किंवा तांदूळ अजिबात खात नाही. याव्यतिरिक्त ती सतत शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाणी पित असते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक रचना वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Celebrity fitness kabir singh fame actress kiara advani fitness workout routine and beauty secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.