अनेकदा डोकेदुखी, फूड पॉयझनिंग किंवा पोटामध्ये उद्भवलेल्या एखाद्या समस्येमुळे अनेकदा अस्वस्थ वाटणं किंवा उलटी सारखं वाटणं, मळमळणं यांसारख्या समस्या उद्भवतात. पण तुम्हाला माहीत आहे का? या सर्व कारणांव्यतिरिक्त इतरही अनेक कारणांमुळे उलटी येऊ शकते. उलटी सारखं वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं यामागे अनेकदा साधारण कारणं असतात. पण या कारणांव्यतिरिक्त अनेकदा काही गंभीर कारणंही असतात. अशातच आज आम्ही तुम्हाला उलटी येण्यामागील काही कारणं, लक्षणं आणि उपचारांबाबत... 

उलटी म्हणजे आहे तरी काय? 

वोमेटिंग किंवा उलटी हा कोणताही आजार नसून ही एक समस्या आहे. खरं तर एक प्रक्रिया आहे जी काही विशेष कारणांमुळे होते. वैद्यकिय भाषेमध्ये या समस्येला 'इमेसिस' असं म्हणतात. उलटी एक अनियंत्रित आणि अनैच्छिक शारीरिक प्रक्रिया आहे. 

उलटी आल्यानंतर पोटातील पदार्थ तोंडामार्फत बाहेर पडतात. तसेच अस्वस्थ वाटणं किंवा मळमळ होण्याचा अर्थ आहे की, उलटी येण्यासारखं वाटणं किंवा मळमळ होणं. 

उलटी येणं, अस्वस्थ वाटणं आणि मळमळणं या समस्या उद्भवण्याची अनेक कारण असतात. तसेच कोणत्याही वयातील व्यक्तीला या समस्या होऊ शकतात. उलटी येण्याची प्रक्रीया मेंदूच्या अनैच्छिक शारीरिक कामांना नियंत्रित करणाऱ्या भागाद्वारे नियंत्रित करण्यात येते. तसेच ही एक अशी समस्या आहे जी मेंदूच्या संकेतानुसार, काम करतात. 

उलटीचे संकेत शरीरामध्ये अनेक उत्तेजनांमधून उत्पन्न होतात. जसं गंध, एखाद्या पदार्थांची चव, विविध आजार, भावना म्हणजेच, घाबरणं, जळजळणं, चक्कर येणं इत्यादी शारीरिक गोष्टींमुळे उलटीची समस्या होऊ शकते. 

उलटी येण्याची कारणं... 

1. अनेकदा पोट आणि घशामध्ये जळजळ होते, ज्यामुळे उलटीची समस्या उद्भवते. पोटामध्ये किंवा घशामध्ये उद्भवणाऱ्या जळजळीमुळे इसोफेजाइटिस (esophagitis) किंवा तीव्र गेस्ट्राइटिस यांसारख्या समस्या होऊ शकतात. 

2. मायग्रेनमुळे किंवा डोकेदुखीमुळेही उलटी येऊ शकते. 

3. डोक्यामध्ये दबाव म्हणजेच, इंट्राक्रेनियल प्रेशर वाढल्यानेही उलटीची समस्या उद्बवते. यामध्ये एकादा आजार किंवा दुखापतीमुळे मेंदूमध्ये इंट्राक्रेनियल प्रेशर वाढतं. त्यामुळे मळमळ होते, अनेकदा उलटीही येते. 

4. थकवा जाणवणं, शरीराचं तापमान वाढणं, प्रखर उन्हामध्ये फिरणं तसेच शरीरामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे होणाऱ्या डिहाइड्रेशनमुळेही उलटी येऊ शकते. 

5. जर तुम्हाला गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स आजार असेल तर त्यामुळेही तुम्हाला उलटी येण्याची समस्या उद्भवू शकते. यामध्ये पोटातून अम्लीय पदार्थ इसोफेगसमध्ये रिफ्लक्स होऊ लागतात. 

6. पेप्टिक अल्सर म्हणजेच, पोटामध्ये उद्भवणारे अल्सरही उलटीसाठी कारण ठरतात. पोटाटत अल्सर झाल्यामुळे पोटामध्ये जळजळ होते. जर ही जळजळ वाढली तर पोटाला नुकसान पोहोचवते. त्यामुळे उलटी येण्याची शक्यता वाढते. 

7. अनेकदा काही औषधांच्या सेवनानेही उलट्या होतात. नॉनस्टेरॉइडल एंटी-इन्फ्लेमेट्री औषधं जसं इस्पिरिन आमि आयबूप्रोफेन इत्यादी औषधांमुळे उलटीची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त मद्य, धुम्रपान यांच्या सेवनानेही पोटामध्ये जळजळ होत. त्यानंतर उलटी आणि मळमळ होण्यासारखी समस्या होऊ शकते. 

8. पोटात इन्फेक्शन झालं असेल किंवा जळजळ, ताप, थंडी वाजत असेल तर उलटीची समस्या उद्भवू शकते. रोटावायरसमुळे संसर्ग होणं हेदेखील उलटीचं कारण ठरू शकतं. तसेच फूड प्वॉयझनिंग झाल्यानंतर गंभीर रूपात उलट्या होऊ लागतात. 

9.गरोदरपणात महिलांना अनेकदा उलट्या येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामध्ये घाबरण्यासारखं काही नसून ही एक साधारण प्रक्रिया आहे. पण त्रास अधिक होत असल्यास दुर्लक्षं न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

10. हार्ट अटॅक येण्याआधी अनेक लोकांना उलटीची समस्या उद्भवते. हे एन्जाइनाचं एक सामान्य लक्षण आहे, त्याचबरोबर फुफ्फुसांचं संक्रमण म्हणजेच, न्यूमोनिया आणि ब्रोंकायटिस इत्यादी समस्यांमुळेही उलटी येऊ लागते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Causes of vomiting and nausea in Marathi these are reason which causes for vomiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.