शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तीळाचा बदलता आकार अन् रंग असु शकतं कॅन्सरचं लक्षण, वेळीच सावध व्हा! तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 16:50 IST

तीळ आणि मेलेनोमा (Melanoma) एकाच प्रकारच्या पेशी मेलेनोसाइट्सपासून (Melanocytes) तयार होतात आणि ते निसर्गत: (Nature) सारखेच असतात. हे दोन्ही प्रकार म्हणजे त्वचेच्या गाठी (Skin tumor) आहेत. परंतु तीळ हानीकारक नाही. तर, मेलेनोमा कर्करोगजन्य (Cancer) आहे आणि त्यावर उपचार करणं आवश्यक आहे, अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतं.

 तीळाबाबत आपल्या मनात अनेक समज-गैरसमज असतात. मात्र, यापैकी काही तीळांबाबत सावध राहण्याची गरज आहे. कारण तीळ आणि मेलेनोमा (Melanoma) एकाच प्रकारच्या पेशी मेलेनोसाइट्सपासून (Melanocytes) तयार होतात आणि ते निसर्गत: (Nature) सारखेच असतात. हे दोन्ही प्रकार म्हणजे त्वचेच्या गाठी (Skin tumor) आहेत. परंतु तीळ हानीकारक नाही. तर, मेलेनोमा कर्करोगजन्य (Cancer) आहे आणि त्यावर उपचार करणं आवश्यक आहे, अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतं.

नेचर सेल बायोलॉजीमध्ये (Nature Cell Biology) प्रकाशित केलेल्या अभ्यासात, अमेरिकेतील दि युनिव्हर्सिटी ऑफ उटाह (The University of Utah) विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट जुडसन टोरेस यांनी सामान्य तीळ मेलेनोमामध्ये कसा बदलू शकतो, याची माहिती दिली आहे. सूर्यकिरणांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी मेलानोसाइट्स पेशी त्वचेला रंग देतात. मेलानोसाइट्सच्या डीएनए क्रमातील विशिष्ट बदलाला BRAF जनुक उत्परिवर्तन (BRAF gene mutation) म्हणतात. ते ७५ टक्के तीळांमध्ये (Do not take lightly the mole of the Skin) आढळते.

रॉबर्ट जडसन टोरेस (Robert Judson Torres) यांच्या मते, हे बदल सुमारे ५० टक्के मेलेनोमा आणि आतडी आणि फुफ्फुसाच्या सामान्य कर्करोगांमध्ये देखील आढळतात. आतापर्यंत असं मानलं जात आहे की, मेलेनोसाइट्समध्ये दोन प्रकारचं उत्परिवर्तन होतं. ज्यामुळं पेशींचं विभाजन नियंत्रित आणि अनियंत्रित होते. हाच तीळ आणि मेलेनोमा (कर्करोगाचा एक प्रकार) यांच्यातील फरक आहे.

कशी होते याची सुरुवातअसं आढळून आलंय की, मेलेनोसाइट्सचं मेलेनोमामध्ये रूपांतर होण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त उत्परिवर्तनाची आवश्यकता नसते. त्वचेत असलेल्या मेलॅनिन नावाच्या त्वचेला रंग देणाऱ्या रंगद्रव्याशी प्रखर सूर्यकिरणांचा अचानक संबंध आल्यास किंवा सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांशी (ultraviolet Rays) संपर्क आल्यास किंवा अचानक तीव्र स्वरूपाच्या वातावरणीय बदलांचा सामना करावा लागत असल्यास त्वचेवर परिणाम होतो. यातून मिळणाऱ्या वेगळ्या सिग्नल्समुळं मेलेनोसाइट्सचे जीन्स वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. त्यांचा वातावरणातील बदलांना मिळणारा प्रतिसाद बदलतो. याचा अर्थ, मेलेनोमा पर्यावरणीय संकेतांमुळं (environmental signals) सुरू होतो.

तीळ किंवा चामखीळ हे चिंतेचे कारण आहे का?कर्करोग नसलेले तीळ सामान्यतः एकसमान आणि आकारात सममितीय असतात. तर, मेलेनोमा बहुतेक वेळा आकारात असममित असतात. मेलेनोमामध्ये, तीळ किंवा चामखीळ यांच्या सीमा अनेकदा वेड्यावाकड्या असतात किंवा आकारात अनियमित असतात. तर कर्करोग नसलेल्या तीळांना सहसा गुळगुळीत, चांगल्या प्रकारे कडा असतात.

जेव्हा शरीरावर जखम किंवा जखमा असतात तेव्हा त्वचेवर अनेकदा एकापेक्षा जास्त रंग दिसतात. ते असमान असू शकतात. काळ्या, तपकिरी, लाल आणि गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये त्वचेचा कर्करोग किंवा तीळ दिसू शकतात. तसंच, तुमच्या शरीरावरील इतर तीळांपेक्षा गडद रंगाचे तीळ शोधा. जे तीळ सौम्य असतात, ते सहसा एकाच रंगाचे असतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स