शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

नेहमी थकवा असतो किंवा श्वास कमी झालाय? या लक्षणांवरून जाणून घ्या हार्ट वॉल्व झाले आहेत ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 12:57 IST

Valvular disease : वॉल्वचे रोग मुख्य रूपाने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्टेनोसिस किंवा रिगर्जेटेशन. कठोरतेमुळे उघडण्यास असमर्थ असण्याला स्टेनोसिस म्हटलं जातं आणि बंद करण्यास असमर्थ असल्यास बॅक लीकिंगला रेगुर्गिटेशन म्हटलं जातं.

Valvular disease : भारत आणि इतरही अनेक देशांमध्ये वल्वुलर डिजीज (Valvular disease) सगळ्यात कॉमन हृदयरोगांपैकी एक आहे. या आजाराबाबत जाणून घेण्याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, वॉल्व काय आहे. हृदयामध्ये 4 वॉल्व असतात. हृदय जिवंत ठेवण्यासाठी एका वॉल्वमधून दुसऱ्या वॉल्वमध्ये ब्लड फ्लो सुरू असतो आणि नंतर ते शरीरात पंप केलं जातं. रक्त एका वॉल्वमधून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी एका द्वारातून जावं लागतं. जे एका दिशेकडे निघतं. या दरवाज्यांना वॉल्व म्हटलं जातं.

वल्वुलर डिजीजचे प्रकार? 

या वॉल्वचे रोग मुख्य रूपाने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्टेनोसिस किंवा रिगर्जेटेशन. कठोरतेमुळे उघडण्यास असमर्थ असण्याला स्टेनोसिस म्हटलं जातं आणि बंद करण्यास असमर्थ असल्यास बॅक लीकिंगला रेगुर्गिटेशन म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला वल्वुलर डिजीज झाला तर एका किंवा त्यापेक्षा जास्त वॉल्वमध्ये अडथळा निर्माण होतो.

वल्वुलर डिजीजची लक्षणं

हूशिंग साउंड ज्याला डॉक्टर स्टेथोस्कोपने ऐकू शकतात

छातीत वेदना

पोटावर सूज

थकवा

श्वास घेण्यास त्रास, खासकरून झोपल्यावर

टाचा आणि पायांवर सूज

चक्कर येणे

बेशुद्ध पडणे

वल्वुलर डिजीजची कारणं

रूमेटिक हार्ट डिजीज

डिजेनरेटिव वॉल्व डिजीज

हार्ट अटॅक

कार्डियोमायोमाथिस

थायरॉयड रोग

डायबिटीज मेलेटस

हाय ब्लड प्रेशर

रेडिएशन थेरपी

जेनेटिक हार्ट डिजीज

पेसमेकर लावलेलं असणे किंवा एआईसीडी लीड इत्यादी

वल्वुलर डिजीजचं निदान आणि उपचार

डॉक्टरांनुसार, वल्वुलर डिजीजला रोखण्याच्या उपायांमध्ये लोकांना त्वचा रोग आणि घशात खवखव रोखणं गरजेचं आहे. ज्यासाठी दात आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल. जर कुणाला रूमेटिक फिवर असेल, त्याला प्रोफिलॅक्सिस रूपात इंजेक्शन पेनिसिलिन दिलं जातं. जर व्यक्ती रूमेटिक फिवर आहे, पण कार्डाइटिस नसेल तर 5 वर्ष किंवा व्यक्तीच्या 21 वर्षापर्यंत इंजेक्शन दिलं जातं. जर कार्डिटिस आहे, पण कोणतंही वल्वुलर डॅमेज नाही तर prophylactic  इंजेक्शन दिलं जातं.

वल्वुलर डिजीजपासून बचावाचे उपाय

1) कमी मीठ असलेला आहार घ्या

2) नियमितपणे एक्सरसाइज करा

3) वजन वाढू देऊ नका

4) धूम्रपान आणि दारूचं सेवन टाळा

5) तणाव घेऊ नका

6) योग आणि मेडिटेशनसाठी वेळ काढा

7) सोशल मीडिया, मोबाइल, व्हिडीओ गेम टाळा

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य