शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

​डबाबंद अन्न आरोग्यासाठी हानिकारक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 11:01 IST

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळेअभावी म्हणा किंवा वाढत्या ट्रेंडमुळे बहुतांश लोकं डबाबंद अन्नाकडे वळत आहेत. मात्र, आपणास माहित आहे का, या डबाबंद अन्नाचे नियमित सेवन करणे किती धोक्याचे आहे?

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळेअभावी म्हणा किंवा वाढत्या ट्रेंडमुळे बहुतांश लोकं डबाबंद अन्नाकडे वळत आहेत. मात्र, आपणास माहित आहे का, या डबाबंद अन्नाचे नियमित सेवन करणे किती धोक्याचे आहे? यातील चायनीज पदार्थात असलेल्या अजिनामोटो नावाच्या घटकामुळे मधुमेह, रक्तदाब, अल्सर, गॅसेस, स्थुलता आदी विकार होऊ शकतात. हे अन्न जादा काळ टिकावे यासाठी अशा पदार्थामध्ये मोठया प्रमाणावर प्रिझर्व्हेटिव्ह तसेच रंगांचा वापर होतो. यात व्हिनेगार देखील असते. कृत्रिम रंग आरोग्यास किती हानी पोहोचवते हे आपणास माहितच आहे. फ्रोझन आणि डबाबंद पदार्थांचे तोटे खूपच आहेत. अन्न प्रक्रियेत हे पदार्थ अगोदर गरम पाण्यात धुतले जातात. साहजिकच त्यांच्यातील 'क' आणि 'ब' जीवनसत्वं नष्ट होतात. फळांच्या डबाबंद प्रक्रियेत त्यांच्या साली काढल्या जातात, त्यामुळे त्यांच्यातील 'फायबर'चं प्रमाण खूप कमी होतं. ते सेवन करणाºयांना साहजिकच त्यामुळे होणाºया फायद्यांना मुकावं लागतं. या पदार्थांमध्ये मोनो-सोडियम ग्लुटामेट, सोडियम टार्टारेट असे क्षार मिसळले जातात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांपेक्षा क्षार जास्त असतात. डबाबंद पदार्थ हे साखरेच्या पाकात टिकवले जातात; त्यामुळे त्यांच्यातील साखरेचं आणि उर्जेचे प्रमाण खूप वाढतं. साहजिकच वजनवाढ, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांना ती बाधक ठरतात. साध्या द्रवपदार्थात किंवा त्याच फळाच्या रसात भिजवलेले फळांचे काप कमी बाधक ठरतात. डबाबंद अन्न, प्रोसेस्ड अन्न, प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं अन्न हे सर्व खाल्ल्याने पचनाचे विकार होतात. आपल्या चुकीच्या सवयी व चुकीच्या पद्धतीचा आहार पचनाच्या तक्रारी निर्माण करतात.