डोक्यावर चिकटून बसलेला डॅंड्रफ होईल लगेच दूर, कापरासोबत मिक्स करा या 2 गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 02:05 PM2024-01-24T14:05:43+5:302024-01-24T14:06:16+5:30

यावर जर वेळेवर उपचार केले नाही तर डोक्याच्या त्वचेला एलर्जी होण्यापासून ते केसगळतीची समस्या होते.

Camphor kapoor and lemon juice natural Ayurvedic remedies to control dandruff | डोक्यावर चिकटून बसलेला डॅंड्रफ होईल लगेच दूर, कापरासोबत मिक्स करा या 2 गोष्टी!

डोक्यावर चिकटून बसलेला डॅंड्रफ होईल लगेच दूर, कापरासोबत मिक्स करा या 2 गोष्टी!

केसांमध्ये डॅंड्रफ म्हणजे कोंडा होणं कॉमन समस्या आहे. पण हिवाळ्यात ही समस्या जास्तच वाढते. जर तुम्ही सुद्धा ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असाल आणि काहीच फायदा झाला नसेल, तर हा उपाय तुमच्या खूप कामात येईल. 
चांगले आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवे असतात. पण अनेकदा वातावरण बदलामुळे किंवा चुकीच्या ब्युटी प्रोडक्ट्समुळे डॅंड्रफची समस्या वाढू लागते. यावर जर वेळेवर उपचार केले नाही तर डोक्याच्या त्वचेला एलर्जी होण्यापासून ते केसगळतीची समस्या होते.

हिवाळ्यात का वाढते ही समस्या

बदलत्या वातावरणात अनेक चांगल्या गोष्टींसोबतच अनेक समस्याही येतात. खासकरून हिवाळ्यात जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा ते आपल्या त्वचेसोबतच आपल्या डोक्याच्या त्वचेमधून ऑइल नष्ट करतं. ज्यामुळे डोक्याची त्वचा ड्राय होणं सुरू होतं. नंतर त्वचेच्या पापड्या पडू लागतात. त्यानंतर केसगळती सुरू होते. 

अजूनही काही कारणे

केवळ ड्राई किंवा ऑयली त्वचा नाही तर सेबोरहाइक आणि मलेसेजियासारख्या फंगल इन्फेक्शनमुळेही केसात डॅंड्रफ होतं. अनेकदा हार्मोनल बदलांमुळे डोक्याची त्वचा कोरडी होते. तसेच हेल्दी डाएट ज्यात प्रोटीन, आयर्न, फायबर व हेल्दी फॅट्स कमी झाल्यानेही केस कमजोर होऊ लागतात. तसेच डोक्याची त्वचाही खराब होते. अशात काही अशा नॅचरल गोष्टी आहेत ज्यांद्वारे तुम्ही सहजपणे डॅंड्रफची समस्या दूर केली जाऊ शकते. 

कापूरासोबत तेल

इंस्ट्राग्रामच्या एका रीलमध्ये डॅंड्रफची समस्या दूर करण्याचा एक उपाय सांगण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला 2 ते 3 कापरं बारीक करून त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका आणि चांगलं मिक्स करा. मग यात एक कप गरम पाणी टाकून खोबऱ्याचं तेल मिक्स करा. आठवड्यातून तीन वेळा हे मिश्रण 45 मिनिटांसाठी केसांना लावा. नंतर माइल्ड शाम्पूने केस धुवा. याने तुम्हाला आराम मिळेल.

तेलामुळेही होतो फायदा

मुळात भीमसेनी कापरामध्ये अॅंटी-फंगल तत्व असतात. जे फंगसची ग्रोथ वाढणं रोखण्यास मदत करतात. सोबतच यातील थंड तत्वांमुळे डोक्याची त्वचाही थंड होते, त्यावर जळजळ कमी होते. जेव्हा हा कापूर आपण डोक्यावर लावतो तेव्हा हेअर फोलिकल्स उघडण्यासही मदत मिळते. तेच लिंबाच्या रसामुळे डोक्याच्या त्वचेचं पीएच लेव्हल बॅलन्स करून फंगसची  ग्रोथ रोखण्यास मदत मिळते. 

Web Title: Camphor kapoor and lemon juice natural Ayurvedic remedies to control dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.