....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी

By manali.bagul | Published: September 27, 2020 10:51 AM2020-09-27T10:51:55+5:302020-09-27T11:02:12+5:30

'द गार्डीयन' च्या रिपोर्टनुसार बेरिस यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलं जात असलेला निधी ३० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.

Britain become who largest donor with 30 percent funding increase for covid 19 |  ....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी

 ....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाल्यानंतर सुरूवातीपासून  माहामारी नियंत्रणात ठेवण्यासाठी WHO नं  अनेक प्रयत्न केले. तर अनेक देशांनी WHO वर आरोप करण्याचे सत्र सुरू ठेवले. ब्रिटनचे पंतप्रधान बेरिस जॉनसन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी वाढवण्याची घोषणा केली आहे. 'द गार्डीयन' च्या रिपोर्टनुसार बेरिस यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलं जात असलेला निधी ३० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. अमेरिका वेगळी झाल्यानंतर  जॉनसन यांनी एक पाऊल पुढे टाकल्यास ब्रिटन  जागतिक आरोग्य संघटनेला निधी देत असलेल्या देशांमध्ये पहिल्या स्थानी असेल.

संयुक्त राष्ट्रांच्या जनरल सभागृहात बोरिस जॉनसन यांनी कोरोना व्हायरसशी लढताना आंतरराष्ट्रीय स्तरावर येत असलेल्या समस्यांना दूर करण्याचे आवाहन केले आहे.  कोरोनाच्या संकटकाळात अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर वेगवेगळे आरोप केले आणि स्वतःला जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं ठेवलं. खरं पाहता जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सगळ्यात जास्त निधी मिळत होता. 

फंडिंग में 4 वर्षों के लिए 30% इजाफा

बेरिस जॉनसन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिल्या जात असलेल्या फंडींग मध्ये  ३० टक्क्यांनी वाढ केल्यास  पुढच्या चार वर्षापर्यंत ३० अब्ज रुपये द्यावे लागतील. या मोबदत्यात ब्रिटिनचे पंतप्रधान जागतिक आरोग्य संघटनेकडून काही मागणीही करू शकतात.  जगभरातील देशांकडून कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती जाणून घेण्यासाठी रिपोर्ट मागवू शकतात.

 द गार्डियनच्या रिपोर्टनुसार प्री रिकॉर्डेड व्हिडीओमध्ये जॉनसन यांनी केलेल्या घोषणेनुसार ९ महिन्यांपर्यंत कोरोनाशी लढा दिल्यानंतरही आंतराराष्ट्रीय स्तरावर फारसे प्रयत्न केले जाताना दिसत नाहीत. जोपर्यंत आपण संकटांशी सामना करण्यासाठी एकजूट होणार नाही. तोपर्यंत जिंकणं कठीण आहे. ब्रिटनने वाढवलेला निधी हा चार वर्षांपर्यंत असेल. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेला निधी पुरवणारा ब्रिटन हा सगळ्यात परोपकारी देश असेल. दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीनंतर अमेरिकेतून WHO ला पुन्हा निधी मिळू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरीही ब्रिटन सगळ्यात अग्रेसर असेल. 

विशेष शक्ति की मांग पर समझौता!

कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही' WHO च्या प्रमुखांचे  विधान

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केलं होतं. 'कोविड १९ ज्या ज्या लसींवर कामम सुरू आहे. त्या लसी कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी ठरतील याची कोणतीही शाश्वती देता येणार नाही.' जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी सांगितले होते की, ''जगभरात ज्या कोरोना लसींवर काम सुरू आहे. त्या लसी प्रत्यक्षात कितपत परिणामकारक ठरतील याची शाश्वती देता येणार नाही. आतापर्यंत अनेक लसींची पडताळणी जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. लवकरच सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल अशी आशा आम्हाला आहे.''  याशिवाय त्यांनी सांगितले होते की, २०० लसींवर सध्या काम सुरू आहे. कोविड १९ च्या अनेक लसी प्री क्लीनिकल टेस्टिंगमध्ये आहे. लस निर्माण प्रक्रियेत काही लसी यशस्वी होतात. तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो.

हे पण वाचा-

मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार

डेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Web Title: Britain become who largest donor with 30 percent funding increase for covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.