डेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 03:57 PM2020-09-25T15:57:32+5:302020-09-25T16:00:11+5:30

CoronaVirus News & Latest Updates : डेंग्यूचा फ्लेविव्हायरस सेरोटाइप आणि कोरोना व्हायरस यांचा आपापसात संबंध आहे. डेंग्यू झाल्यानंतर तयार होत असलेल्या  एंटीबॉडी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला  नियंत्रणात ठेवतात.

Dengue makes stronger against covid-19 virus immunity protect from coronavirus? | डेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

डेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसवर गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. या संशोधनामुळे तज्ज्ञही चकीत झाले आहेत.  कारण कोरोना विषाणूंशी निगडीत नेहमीच वेगवेगळे खुलासे होत आहेत. ब्राझिलमध्ये कोरोनावर संशोधन करण्यात आलं होतं यानुसार डेंग्यू झाल्यानंतर  एखाद्या रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या तर या एंटीबॉडीज कोरोनाशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहेत. अशा लोकांमध्ये संक्रमणाचं प्रमाण कमी दिसून आलं आहे. 

ब्राझिलमध्ये  कोरोना व्हायरसच्या संशोधनात दिसून आलं होतं की, डेंग्यू या आजारामुळे लोकांच्या शरीरात एंटीबॉडी विकसीत झाल्या होत्या. त्यात एंटीबॉडी कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरल्या आहेत. त्यामुळे  कोरोना संक्रमणाचा धोका कमी होत आहे.  या संशोधनात २०१९ आणि २०२० दरम्यान डेंग्यू झालेल्या रुग्णांवर परिक्षण करण्यात आलं होतं. 

डेंगू (सांकेतिक तस्वीर)

हे संशोधन  ड्युक युनिव्हर्सिटीचे  प्राध्यापक मिगुएल निकोलेलिस यांनी केले होते. निकोलेलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्यूपासून बचावसाठी तयार करण्यात आलेली लस कोरोना व्हायरसपासूनही सुरक्षा देऊ शकते. या संशोधनातून दिसून आलं की,  ज्या देशांमध्ये यावर्षी किंवा मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर लोकाना डेंग्यू झाला होता.  त्या ठिकाणी कोरोना संक्रमणाचं प्रमाण कमी होतं. 

डेंग्यूचा फ्लेविव्हायरस सेरोटाइप आणि कोरोना व्हायरस यांचा आपापसात संबंध आहे. डेंग्यू झाल्यानंतर तयार होत असलेल्या  एंटीबॉडी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला  नियंत्रणात ठेवतात. हे योग्य असल्याचे सिद्ध झाले, तर डेंग्यूच्या संसर्गाचा किंवा डेंग्यूची एक सुरक्षित आणि प्रभावी लस कोरोनाविरोधात काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते, असा दावा तज्ज्ञांकडून  करण्यात आला आहे.

प्राध्यापक निकोलेलिस  दिलेल्या माहितीनुसार या संशोधनातून समोर आलेले निकष महत्वपूर्ण आहेत. त्याचं कारण म्हणजे आधीच्या अनेक संशोधनामधून ज्यांच्या रक्तात डेंग्यूची एंटीबॉडी आढळून येते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसेल तरी त्यांची कोरोना चाचणी चुकीच्या पद्धतीने पॉझिटिव्ह येत आहे. ही बाब अनपेक्षित असण्याचं कारण म्हणजे हे दोन्ही व्हायरस एकमेकांपासून वेगळे आहेत. निकोलेलिस यांचे हे संशोधन आतापर्यंच कुठेही प्रकाशित  करण्यात आलेलं नाही. पण MedRxiv च्या प्रीप्रिंट सर्व्हरवर हे संशोधन परीक्षणासाठी अपलोड करण्यात आले आहे.

समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) संस्थेतर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले  होते.  यात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चार  लक्षणांबाबात सांगण्यात आलं होतं. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर ही लक्षणं २ ते ४ दिवसांमध्ये दिसून येतात. NHS च्या एडवायजरीनुसार ही लक्षणं एक दिवस किंवा एका दिवसापेक्षा जास्त तर अनेकदा संक्रमण पूर्ण कमी होईपर्यंत दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. 

बेशुद्ध होणं

कोरोना संक्रमणामुळे मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ही लक्षणं  कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. NHS नं दिलेल्या माहितीनुसार डोकेदुखी, थकवा येणं यासोबत अस्वस्थ वाटणं,  बेशुद्ध होणं ही स्थितीही उद्भवू शकते.  

सतत खोकला येणं

सुका खोकला येण्याची वेगवेगळी कारणं आहेत. सतत  खोकला येत असेल तर व्हायरसच्या संक्रमणाचं कारण असू शकतं.  UK च्या एका सर्वेमध्ये दिसून आलं की कोरोनामुळे संक्रमित असलेल्या एका रुग्णाला जवळपास चार  तासांपर्यंत  खोकला येण्याची समस्या उद्भवली होती. 

त्वचेच्या रंगात बदल होणं

कोरोनाचं संक्रमण झाल्यास त्वचेवर सुज येते अनेकदा चट्टे पडतात. त्वचेच्या  रंगात बदल  होणं हे कोरोना संक्रमणाचं लक्षण असू शकतं. अशी लक्षणं तरूणांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. काहीवेळा पायांना जखम झाल्याप्रमाणे लक्षणंही दिसतात. 

हे पण वाचा-

खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

Web Title: Dengue makes stronger against covid-19 virus immunity protect from coronavirus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.