तोंडाने श्वास घेणं लहान मुलांसाठी ठरू शकतं गंभीर, जाणून घ्या कसं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 09:59 IST2019-11-28T09:55:01+5:302019-11-28T09:59:12+5:30
लहान मुलं ही त्यांना हवं तसं करत असतात, वागत असतात. कारण त्यांना अनेक गोष्टींची समज नसते. आता हेच बघा ना काही लहान मुलांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते.

तोंडाने श्वास घेणं लहान मुलांसाठी ठरू शकतं गंभीर, जाणून घ्या कसं...
(Image Credit : askthedentist.com)
लहान मुलं ही त्यांना हवं तसं करत असतात, वागत असतात. कारण त्यांना अनेक गोष्टींची समज नसते. आता हेच बघा ना काही लहान मुलांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. पण असं करणं त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तोंडाने श्वास घेतल्याने त्यांच्या तोंडात कोरडेपणाची समस्या होऊ शकते. जेव्हा लहान मुलं तोंडाने श्वास घेतात तेव्हा हवा त्यांच्या तोंडात जाते आणि सोबतच मॉइश्चर म्हणजेच ओलावा देखील घेऊन जाते. दुसरीकडे तोंडाचा बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी तोंडात लाळ भरपूर असण्याची गरज असते.
काय होऊ शकते समस्या?
लाळ कमी असल्याकारणाने तोंडाला वेगवेगळ्या समस्यांचा जसे की, कॅविटीज, दातांना इन्फेक्शन, तोंडाला दुर्गंधीची समस्या होऊ शकते. तसेच याने लहान मुलांच्या चेहऱ्याचा आणि दातांचा शेपही बिघडू शकतो. जेव्हा लहान मुलं जास्त काळ तोंडाने श्वास घेतात तेव्हा त्यांना चेहरा पातळ होणे किंवा लांब होणे, दात वाकडे येणे, हसताना हिरड्या दिसणे या समस्याही होऊ शकतात.
झोपेची होते समस्या...
सामान्यपणे जे लोक तोंडाने श्वास घेतात, त्यांना चांगली झोप येत नाही. त्यामुळे त्यांचं शरीर झोपेनंतरही थकलेलं राहतं. कमी झोपेमुळे मेंदू कमजोर होतो आणि इतरही अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या व गंभीर आजार होऊ शकतात.
हृदयासंबंधी आजार
तज्ज्ञांनुसार, तोंडाने श्वास घेण्यादरम्यान योग्य प्रमाणात ऑक्सिजन शरीरात पोहोचू शकत नाही. ज्यामुळे धमण्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोग होऊ शकतात. तसेच मुलांना झोपेसंबंधी समस्याही होऊ शकते.