देशातील तरुणाईला ब्रेनस्ट्रोकचा विळखा! दर ७ रुग्णांमागे १ रुग्ण आहे ४५ वर्षांखालील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:37 IST2026-02-27T13:36:01+5:302026-02-27T13:37:05+5:30

स्ट्रोकमुळे रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूचा दर १३.९% होता, जो तीन महिन्यांत वाढून २७.८% इतका झाला.

Brain stroke afflicts the youth of the country! 1 out of every 7 patients is under the age of 45 | देशातील तरुणाईला ब्रेनस्ट्रोकचा विळखा! दर ७ रुग्णांमागे १ रुग्ण आहे ४५ वर्षांखालील

देशातील तरुणाईला ब्रेनस्ट्रोकचा विळखा! दर ७ रुग्णांमागे १ रुग्ण आहे ४५ वर्षांखालील

नवी दिल्ली : स्ट्रोक हा आता वृद्धांपुरता मर्यादित आजार राहिलेला नाही, तर तरुणांमध्येही याचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. 'राष्ट्रीय स्ट्रोक रजिस्ट्री'च्या ताज्या अहवालानुसार, भारतातील दर सात स्ट्रोक रुग्णांमागे एक रुग्ण हा ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे.

चुकीची जीवनशैली, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तंबाखूचे सेवन ही यामागील प्रमुख कारणे आहेत. अहवालानुसार, स्ट्रोकमुळे रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूचा दर १३.९% होता, जो तीन महिन्यांत वाढून २७.८% इतका झाला.

धक्कादायक आकडेवारी

देशातील ३० रुग्णालयांमधील ३४,७९२ प्रकरणांवर हे संशोधन करण्यात आले. रुग्णांचे सरासरी वय ५९.४ वर्षे तर पुरुषांचे प्रमाण ६३.४% आहे. एकूण रुग्णांपैकी १३.८% रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण ७२.१% आहे.

वेळेवर उपचार न मिळणे ठरतेय जीवघेणे

मेंदूचा झटका आल्यावर सुरुवातीचा काळ महत्त्वाचा असतो, मात्र भारतात वेळेवर उपचार मिळण्याचे प्रमाण का आहे. केवळ २०.१% रुग्ण 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात पोहोचू शक

३७.८% रुग्ण २४ तासांनंतर रुग्णालय दाखल झाले, ज्यामुळे त्यांना तातडीचे आपत्कालीन उपचार मिळाले नाहीत. ६०% प्रकरणांमध्ये नसेत रक्ताची गा झाल्यामुळे स्ट्रोक आला होता. ३४.२% प्रकरणांमध्ये मेंदूची नस फाटल्याने रक्तस्त्राव झाला होता.

हाय बीपी : मोठा धोका : स्ट्रोक येण्यामागे विविध व्यसने आणि आजार कारणीभूत ठरत आहेत.

- ७४.५% रुग्ण उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते.

- २८.५% रुग्ण तंबाखूचे सेवन करत होते.

- २७.३% रुग्ण मधुमेही होते.

- २२.६% रुग्ण धूम्रपान करत होते.

- २०% रुग्ण मद्याच्या आहारी गेलेले होते.

Web Title : युवा भारतीयों में स्ट्रोक का खतरा: सात में से एक 45 वर्ष से कम

Web Summary : युवा भारतीयों में स्ट्रोक की घटनाएँ तेज़ी से बढ़ रही हैं। जीवनशैली, उच्च रक्तचाप, मधुमेह और तंबाकू के सेवन के कारण सात में से एक स्ट्रोक रोगी 45 वर्ष से कम उम्र का है। देरी से उपचार से स्थिति बिगड़ती है; केवल 20.1% ही 'गोल्डन आवर' में अस्पताल पहुँचते हैं।

Web Title : Stroke grips young Indians: One in seven under 45

Web Summary : Stroke incidence is alarmingly rising among young Indians. One in seven stroke patients is under 45, driven by lifestyle, hypertension, diabetes, and tobacco use. Delayed treatment worsens outcomes; only 20.1% reach hospitals within the "golden hour."