जोर लावून नाक शिंकरणं पडू शकतं महागात, जाणून घ्या नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:01 IST2024-12-11T15:00:40+5:302024-12-11T15:01:31+5:30
जास्तीत जास्त लोक नाक शिंकरताना खूप जोर लावतात. जास्त दबावामुळे नाकाच्या आतील भागाचं नुकसान होऊ शकतं. सोबतच अनेक गंभीर समस्याही होऊ शकतात.

जोर लावून नाक शिंकरणं पडू शकतं महागात, जाणून घ्या नुकसान!
थंडीच्या दिवसात सर्दी झाल्यानंतर नाक शिंकरणे ही एक सामान्य सवय असते. नाक शिंकरल्याने आराम तर मिळतो. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने शिंकरलात तर आरोग्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं. जास्तीत जास्त लोक नाक शिंकरताना खूप जोर लावतात. जास्त दबावामुळे नाकाच्या आतील भागाचं नुकसान होऊ शकतं. सोबतच अनेक गंभीर समस्याही होऊ शकतात.
जास्त जोर लावून नाक शिंकरल्याने नसा तर डॅमेज होतीलच, सोबतच नाकातील टिश्यूजना इजा होण्याचा धोकाही असतो. ज्यामुळे नाकातून रक्त येणे आणि नाकात सूज अशा समस्या होतात. इतकंच नाही तर नाकाच्या आत जास्त दबाव तयार झाल्याने म्यूकसला सायनसपर्यंत ढकलू शकतो. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. या सवयीमुळे चक्कर येणे, नाक फ्रॅक्चर आणि नाकाच्या बाहेरील भागात वेदनाही होऊ शकतात.
नाक जोरात शिंकरण्याचे नुकसान
नाकातून रक्त येणे
जोर लावून नाक शिंकरल्याने नाकातील नाजूक रक्तवाहिन्या डॅमेज होतात. ज्यामुळे नाकातून रक्त येऊ शकतं.
कानाचा पडदा फाटणे
जास्त जोर लावून नाक शिंकरल्याने दबाव कानाच्या ईअरड्रमपर्यंत पोहोचू शकतो आणि कानाचं नुकसान होऊ शकतं.
सायनसची समस्या
जोरात नाक शिंकरल्याने कफ आणि हवा सायनसमध्ये जाऊ शकते. ज्यामुळे इन्फेक्शनची समस्या होऊ शकते.
ऑर्बिटल फ्रॅक्चर
गंभीर स्थितीत जोरात नाक शिंकरल्याने डोळ्यांजवळील हाड मोडू शकतं. ज्यामुळे डोळ्यांमध्ये सूज येऊ शकते.
नाक शिंकरताना काय काळजी घ्यावी?
- नाक शिंकरताना हलका जोर लावा. एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीतून हवा काढा. ही प्रक्रिया पुन्हा करा.
- नाक स्वच्छ करताना जोरात दाबू किंवा खेचू नका.
- सतत नाक शिंकरण्याची सवय योग्य नाही. पुन्हा असंच करत असाल तर नाकाच्या आतील भाग डॅमेज होऊ शकतो.
- नाक बंद झाल्यावर वाफ घेणं एक सुरक्षित पर्याय आहे. याने कफ मोकळा होऊन बाहेर पडण्यास मदत मिळते.