उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी रोज दही खाणे म्हणजे आजारावर रामबाण, अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 03:27 PM2021-12-10T15:27:33+5:302021-12-10T15:27:41+5:30

संशोधकांना असे आढळून आले आहे की, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज दही खाल्ल्यास बीपी कमी करण्यास मदत होते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल डेअरी जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

blood pressure patient should eat dahi regularly says study | उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी रोज दही खाणे म्हणजे आजारावर रामबाण, अभ्यासातील निष्कर्ष

उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी रोज दही खाणे म्हणजे आजारावर रामबाण, अभ्यासातील निष्कर्ष

googlenewsNext

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. भारताबद्दलच बोलायचे झाल्यास २०२० मध्ये सुमारे १५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले. एका अहवालानुसार, गेल्या ४ वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुमारे ३५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात हा आजार सुरू आहे.

याविषयीच्या एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया आणि यूएसए युनिव्हर्सिटी ऑफ मेनच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलं आहे. यामध्ये, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित जोखीम घटकांवर दही खाण्याचा परिणाम तपासण्यात आला. ज्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले आहे की, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज दही खाल्ल्यास बीपी कमी करण्यास मदत होते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल डेअरी जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील एक अब्जाहून अधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित समस्या म्हणजे CVD, जसे की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो. CVD हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. यामुळे, अमेरिकेत दर 36 सेकंदाला एका व्यक्तीचा CVD मुळे मृत्यू होतो. ऑस्ट्रेलियामध्ये हा दर १२ मिनिटांचा आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात
संशोधक डॉ. अलेक्झांड्रा वेड म्हणाल्या, 'उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये बीपी नियंत्रणासाठी दही उपयुक्त ठरू शकते. उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा सर्वात महत्वाचा जोखीम घटक आहे, म्हणून आपण ते कमी करण्याचे आणि नियंत्रित करण्याचे मार्ग शोधत राहणे महत्त्वाचे आहे.

डॉ. अलेक्झांड्रा वेड पुढे म्हणाल्या, 'दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: दही बीपी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. याचे कारण म्हणजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, जे बीपी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ते म्हणाले की दही अधिक प्रभावी आहे कारण त्यात बॅक्टेरिया देखील असतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

संशोधन कसे झाले?
संशोधकांनी या अभ्यासात ९१५ लोकांचा समावेश केला. अभ्यासात असे दिसून आले की जे लोक नियमितपणे दही खातात, त्यांचा रक्तदाब दही न खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे ७ पॉईंटने कमी होता. संशोधकांनी सांगितले की, जोखीम घटक असलेल्या लोकांवर दहीचे संभाव्य फायदे तपासण्यासाठी भविष्यात अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

Web Title: blood pressure patient should eat dahi regularly says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.