शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'पी हळद अन् हो गोरी' ही म्हण ऐकली असेलच; पण काळ्या हळदीचे फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 10:59 IST

काळ्या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, हळदीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात.

Black turmeric Benefits : हळद आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. सामान्यपणे सगळ्याच किचनमध्ये पिवळ्या रंगाची हळद पावडर वापरली जाते. याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, हळदीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात.

काळी हळद

इतकंच नाही तर जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नाही की, हळदीचे प्रकारही असतात. हळद फक्त पिवळ्या रंगाची नसते. एक काळी हळदही असते. पण ही हळद पूर्ण काळी नसून काळ्या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये असते.काळी हळद सामान्यपणे भारताच्या पूर्वोत्तर भागात आणि मध्य प्रदेशात उगवली जाते. काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सीडेंट असतात. या हळदीला वैज्ञानिक भाषेत Curcuma caesia असं नाव आहे.

काळ्या हळदीचे फायदे 

काही रिसर्चनुसार, ही हळद आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. ज्यात अ‍ॅंटीफंगल, अ‍ॅंटी अस्थमा, अ‍ॅंटीऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अ‍ॅंटीकॉन्वेलसेंट, अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी अल्सर, मासपेशींना आराम, चिंता आणि डिप्रेशन दूर करणारे गुण प्रामुख्याने आढळतात. तसेच अनेक आजारांमध्येही उपयोगी पडते.

श्वासासंबंधी समस्या होतात दूर

असं सांगितलं जातं की, श्वासासंबंधी आजारांमध्ये काळी हळद फार फायदेशीर असते. यात अ‍ॅंटी इंफ्लेमेट्री गुण असतात. जे सर्दी, खोकला, अस्थमासारख्या आजारांपासून आराम देतात. महत्वाची बाब म्हणजे याचा वापर तुम्ही पिवळ्या हळदीसारखाच करू शकता.

मायग्रेनमध्ये उपयोगी

मायग्रेनची समस्या जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यात डोक्याच्या मागे एका भागात असह्य वेदना होतात. मायग्रेनने पीडित व्यक्ती मोठा आवाज आणि प्रकाशाने संवेदनशील होतो. काळी हळद या समस्येत आराम देऊ शकते. आरामासाठी ताज्या हळदीचा लेप तयार करून कपाळावर लावा.

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. अशात काळ्या हळदीतील अ‍ॅंटी इनफ्लेमेट्री गुण आराम देतात. यासाठी गरम दुधात काळ्या हळदीचं पावडर मिश्रीत करून पिण्याचा सल्ला देतात.

गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका

काळी हळद गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवून देण्याचं काम करते. अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस, सूज, उचकी, अपचन, अल्सर, गॅस्ट्रिक इश्यू आहे. अनेक रूटीन बिघडल्याने आणि खाण्या-पिण्यामुळे ही समस्या होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या हळदीचं योग्य प्रमाणात सेवन पाण्यासोबत करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य