प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा, नाहीतर आमंत्रण द्याल गंभीर परिणामांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 22:37 IST2021-06-15T22:27:26+5:302021-06-15T22:37:27+5:30
आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.

प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा, नाहीतर आमंत्रण द्याल गंभीर परिणामांना
अनेकांना भूक लागली की अनावर होते. अशावेळी समोरचे जेवण कधी एकदा खातोय असे होते. पण सावधान! भूकेपोटी आपण काय खातोय आणि कसं खातोय याकडे लक्ष न दिल्यास परिणाम गंभीर होतात.
आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.
अन्न नीट न चावता खाल्याने 'हे' गंभीर परिणाम होऊ शकतात
पोटदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास.
अन्न नीट न चावता खाल्यास लठ्ठपणाचे प्रमाण वाढत जातं.
अन्न नीट पचन होत नाही.
बद्धकोष्टता, सारखे ढेकर येणं.
वय झाल्यावर सांधेदुखी, गुडघेदुखी असे त्रास होऊ शकतात.
म्हणूनच रोज नेहमीच अन्न नीट चावून खा. नाहीतर अश्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो.